‘एन्काऊंटर’ स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा तडकाफडकी राजीनामा, निवडणूक लढवणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या आतापर्यंतच्या पोलीस सेवेतील कार्यकाळात ११३ गुंडांचा खात्मा करणारे गँगस्टर दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक करणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला असून ते राजकारणात प्रवेश करणार आहेत. शिवसेनेत प्रवेश करुन ते विधानसभा निवडणुक लढविणार असल्याचे सांगितले जात आहे. विधानसभा निवडणुकीसाठी ते अंधेरी किंवा नालासोपारा मतदारासंघातून निवडणुक लढवतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.

प्रदीप शर्मा हे १९८३ मध्ये पोलीस दलात भरती झाले असून सध्या ते ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागातील खंडणी विरोधी पथकामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. त्यांनी ४ जुलै रोजी पोलीस महासंचालकांकडे राजीनामा दिला असून हा राजीनामा वैयक्तिक कारणास्तवर दिला आहे. अजून निवडणुकीबाबत नक्की ठरले नसल्याचे त्यांनी सांगितले.

शर्मा यांचा बहुतांश कार्यकाळ हा मुंबईतील गुन्हे शाखा तसेच विशेष शाखेत गेला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते ठाणे खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सहा महिन्यांनंतर ते निवृत्त होणार होते. मात्र, त्याच्या आत निवडणुका येत असल्याने त्यापूर्वीच त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी राजीनामा दिल्याचे सांगितले जाते.

प्रदीप शर्मा यांचे शिवसेनेसह भाजपामधील अनेक दिग्गज नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. वसई आणि नालासोपारा परिसरात आमदार हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्वाविरोधात लढण्यासाठी आमदार क्षितिज ठाकूर यांच्याविरुद्ध युतीकडून संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

ते गेल्या काही दिवसांपासून पीएस फाऊंडेशनच्या मार्फत अनेक सामाजिक कार्यात सहभागी होत आहेत. त्यामुळे अंधेरीतूनही ते निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रदीप शर्मा यांनी गेल्या वर्षी दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक केली होती. तसेच लष्कर ए तोयबाच्या तीन अतिरेक्यांसह सादिक काल्या, विनोद मटकर, सुहास माकडवाला, रफीक डबा अशा अनेक कुप्रसिद्ध गुंडांसह ११३ गुंडांचा खात्मा त्यांनी केला आहे.

जाणून घ्या कढीपत्त्याचे फायदे !

केळी खाण्याचे १० फायदे, जाणून घ्या

मक्याचा उपमा खाण्याचे ‘हे’ ८ फायदे, जाणून घ्या

‘हे’ उपाय करा अन् मेकअप न करता दिसा एकदम सुंदर, जाणून घ्या

मुलांना नैसर्गिकरित्या गोरे करतात ‘हे’ ५ घरगुती उपाय; जाणून घ्या

हिंगात अनेक औषधी गुणधर्म, ‘हे’ २० रामबाण उपाय, जाणून घ्या