“पार्थची खिल्ली उडवण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन द्या”

पार्थ लंबी रेस का घोडा है .. याद रखना !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पार्थ यांना मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे.  पुण्यातील चिंचवडमध्ये १७ मार्चला पार्थ पवार यांच्या प्रचारसभेचा नारळ वाढवण्यात आला.  या सभेत पार्थ पवार यांचे पहिलं भाषण झाले.  अवघ्या तीन मिनिटांच्या भाषणात पार्थ अनेकदा गोंधळले आणि गडबडलेही.  त्यांच्या या भाषणावर सोशल मीडियावर चर्चा होत आहे. अनेकांनी पार्थ यांच्यावर टीका केली आहे.  तर अनेकांनी त्यांना संभाळून घेण्याचा सल्ला देत त्यांची पाठराखण केली आहे.

पवार यांच्या घराण्यामुळेच पार्थ यांना उमेदवारी मिळाल्याचा आरोप होत आहे.  फक्त तीन मिनिटांचे भाषणही पार्थ पवारांना करता आले नाही.  भाषणावरून त्यांचा आत्मविश्वास कमी वाटला, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला. त्यावर काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी पार्थ पवार यांची बाजू घेतली आहे.

पार्थ पवार यांच्या भाषणावरुन खिल्ली उडवण्यापेक्षा त्यांना प्रोत्साहन देण्याच आवाहन नितेश राणे यांनी लोकांना केलं आहे.  त्यांनी आपल्या ट्विटरवरून ट्वीट करत आपले मत मांडले आहे. पार्थ पवारच्या पहिल्या भाषणवार खिल्ली उडवण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे.. पहिले भाषण आणि मोठी गर्दी.. धाडस लागतो ! लंबे रेस का घोडा है..याद रखना!,  असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.

https://twitter.com/NiteshNRane/status/1107859425199616000