नायगांव येथे ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमण, पोलिसात गुन्हा दाखल

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन –   नायगाव (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर अतिक्रमण केल्या प्रकरणी आठ जनाविरुध्द लोणी काळभोर पोलिसात नायगावच्या ग्रामसेवकांनी तक्रार दाखल केली आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नायगांव येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गट क्र.35 वर गावातील कुंदन मुकिंदा जगताप, दिगंबर लोंढे, पुजा आनंद कांबळे, विठ्ठल किसन चौधरी, दामोदर दगडू थोरे, गुरप्पा सावळा कांबळे व कावेरी सतिश चौधरी यांनी सन 2019 पासून अतिक्रमण केलेले आहे यावर ग्रामसेवक स्वाती अशोक राजगुरु यांनी त्यांना वेळोवेळी तोंडी सुचना दिल्या तसेच नोटीस पाठवल्या परंतु यावर त्यांनी कोणतीच हलचाल केली नाही.

यावर ग्रामपंचायत मालकीची जागा ताब्यात मिळण्यासाठी ग्रामसेवक स्वाती अशोक राजगुरु यांनी लोणी काळभोर पोलीसात रितसर तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे हे पुढील तपास करीत आहेत.