पुणे – सोलापूर महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात ; चौफुला चौकातील अतिक्रमण, फ्लेक्स हटवले

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील चौफुला चौकामध्ये दुपारी एक वाजता पुणे – सोलापूर महामार्ग प्राधिकरणाच्या महाराष्ट्र सुरक्षा बलाने अतिक्रमण विरोधी कारवाई करत जागोजागी लागलेले फ्लेक्स आणि फेरीवाल्यांचे स्टॉल हटविण्यास सुरुवात केली.

पुणे – सोलापूर मार्गावर कासुर्डी ते इंदापूर दरम्यान हायवेवरील सर्वच अतिक्रमणे पाटस टोल प्लाझा कडून काढण्यात येत असल्याची माहिती तेथील रूट ऑफिसर राजेंद्र शेवाळे यांनी दिली.

अतिक्रमणे काढली जात असल्यामुळे येथे होणाऱ्या अपघातांना आळा बसणार आहे. अनेकवेळा फ्लेक्समुळे समोरील वाहने दिसत नसल्याने मोठे अपघात होतात. तसेच रस्त्यावरच फेरीवाल्यांनी दुकाने थाटल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. या कारवाईमुळे वाहनचालक आणि प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Loading...
You might also like