Bye-Bye 2019 : PM मोदी – HM शाह आणि CM योगी यांच्याबद्दल काँग्रेसकडून ट्विटरवर ‘Poll’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2019 च्या निरोपानिमित्त काॅंग्रेसने भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे. काॅंग्रेस पक्षाकडून ट्विटर पोल घेण्यात येत आहे. पहिल्या सर्वेक्षणात #BJPJumlaAwards साठी मतदान करण्यास सांगण्यात आले आहे आणि ३१ डिसेंबर रोजी विजेत्यांची नावे जाहीर करण्यात येणार आल्याचे समजते आहे. त्याच बरोबर, ‘पोल ऑफ द इयर’ म्हणून दुसरे पोल चालवले गेले आहे. सोमवारी सायंकाळपासून काॅंग्रेसने आतापर्यंत ५पोल घेतले आहे.

पहिल्या पोलमध्ये काॅंग्रेस पक्षाने ट्वीट करून लिहिले आहे की, ”भाजपाच्या अशा मोठ्या विधानांनी आम्ही वर्ष संपवत आहोत. #BJPJumlaAwards मध्ये आपले स्वागत आहे, मतदान करत रहा, उद्या आपण विजेत्यांची नावे सांगू. भाजप नेत्यांच्या डायलॉगवर बॉलिवूडला काहीही मिळाले नाही. डायलॉग ऑफ द इयर नॉमिनीज… या मतदानात पंतप्रधान मोदी (क्लाउड कव्हर), अर्थमंत्री निर्मला सीतारमण (कांदा) आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

रडार संदर्भातील विधानावर काॅंग्रेसचा घेराव :
बालाकोट हवाई हल्ल्यादरम्यान एका वाहिनीवरील मुलाखतीदरम्यान पंतप्रधान मोदींनी क्लाऊड कव्हरबद्दल बोलले होते की, हवाई हल्ल्याच्या दिवशी हवामान ठीक नसल्याचे त्यांनी म्हटले होते. त्या दिवशी तज्ञांचे म्हणणे होते की, स्ट्राईक हा दुसऱ्या दिवशी झाला पाहिजे. परंतु मी त्यांना सल्ला दिला की, हे हवामानच आपली मदत करेल आणि आमची लढाऊ विमान रडारच्या नजरेत येणार नाही. त्यानंतर काॅंग्रेसने पंतप्रधान मोदींना घेराव घातला होता. काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट केले होते की पाच वर्षाच्या सरकारमध्ये जुमलाच फेकत राहिलो, समजत होतो क्लाऊडी वातावरण आहे, नाही येणार रडारवर… विरोधी पक्षातील इतर नेत्यांनी देखील मोदींच्या या वक्तव्यानंतर विनोद केले होते.

कांद्याच्या वादावर वित्तमंत्र्यांचे वक्तव्य चर्चेत :
देशातील कांद्याच्या किंमतीबाबत सामान्य माणूस नाराज आहे. आजही कांदा शंभरच्या पलीकडे आहे. कांदा वादावरून अर्थमंत्र्यांच्या विधानाची सभागृहात जोरदार चर्चा झाली. लोकसभेत अर्थमंत्री म्हणाले होते, ‘मी इतका लसूण, कांदा खात नाही. मी अशा कुटुंबातून आहे जिथे कांदा खाल्ला जात नाही.’

प्रकाश जावडेकर यांचे वादग्रस्त विधान :
केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकसभेत प्रदूषणाबाबत वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले की कोणताही भारतीय अहवाल नाही जो सूचित करतो की, प्रदूषणामुळे वय कमी होते. अशा प्रकारच्या बोलण्याने भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये असेही प्रकाश जावडेकर म्हणाले.

दुसरा पोल :
त्याच बरोबर, ‘पोल ऑफ द इयर’ म्हणून दुसरा पोल चालवण्यात आला. यात गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान मोदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काॅंग्रेसने ट्वीट करून लिहिले की, ‘त्यांचे जॅकबूट्स आणि त्यांच्या बंदुका, त्यांच्या काठ्या आणि त्यांचे ट्रोल, या पैकी कोणता भाजप नेता अत्याचारी आहे? ‘वर्षाचा हुकूमशहा’ नॉमिनीज … ‘

दरम्यान, सीएए आणि एनआरसीसंदर्भात देशातील बर्‍याच राज्यांत निदर्शने होत आहेत. उत्तर प्रदेश, दिल्ली आणि आसामसारख्या राज्यात बरीच खळबळ उडाली होती. यूपीमधील आंदोलकांसमवेत पोलिसांच्या या वृत्तीवर कडक टीका केली जात आहे. याच वर्षी एका आंतरराष्ट्रीय नियतकालिकेने 20 मे च्या नवीन आवृत्तीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुखपृष्ठावर ठेवले. ‘India’s Divider in Chief’ असे त्यांचे वर्णन करण्यात आले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/