हृदंतस्तरशोथ (एन्डोकारडायटिस) म्हणजे काय ? काय आहेत याची ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’ ?

हृदंतस्तरशोथ (एन्डोकारडायटिस) काय आहे?

आपल्या हृदयात 3 थर असतात. पहिला पेरीकार्डियम, मायोकार्डियम आणि एंडोकार्डियम. जो सर्वात आतील थर आहे तो आहे एंडोकार्डियम. यावर सूज येणं याला हृदंतस्तरशोथ (एन्डोकारडायटीस) म्हणतात. एंडिकार्डियमवर जीवाणूंच्या संसर्गामुळं सूज येते. जीवाणू तोंडावाटे आत जातात आणि रक्तप्रवाहापर्यंत पोहोचतात आणि शेवटी एंडोकार्डियमला प्रभावित करतात.

काय आहेत याची लक्षणं ?

– थंडी वाजून ताप येणं
– श्वास घेण्यात अडचण येणं
– श्वास घेतान छातीत दुखणं
– पायांवर सूज येणं
– त्वचेवर लहान लाल डाग
– थकवा
– सांधेदुखी आणि अंगदुखी

काय आहेत याची कारणं ?

जीवाणू पुढीलप्रमाणे रक्तप्रवाहात प्रवेश करतात आणि हृदंतस्तरशोथ होतो.

– तोंडावाटे
– त्वचा आणि हिरड्यांचा संसर्ग
– निर्जंतुक न केलेल्या सुया किंवा सीरींजचा वापर.
– कॅथेटर्स आणि लेप्रोस्कोपसारखी वैद्यकीय उपकरणं
– जन्मजात हृदयरोग, हृदयाच्या वाल्वचा रोग
– उच्च रक्तदाब
– कृत्रिम वाल्व
– हृदयरोगचा इतिहास असणाऱ्यांना एंडोकारडायटीसचा धोका असतो.

काय आहेत यावर उपचार ?

1) वैद्यकीय व्यवस्थापन – ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटीक्स किंव कल्चरच्या अहवाला प्रमाणे तोंडी किंवा शिरेच्या आत दिले जाऊ शकते. कधी कधी तापावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच शरीराच्या वेदना आणि मळमळ कमी करण्यासाठी अँटीपायरेटीक्सचा वापर केला जाऊ शकतो.

2) शस्त्रक्रिया व्यवस्थापन – हे रुग्णांना दिलं जातं जे मिथ्राल स्नेनोसिससारख्या हृदयाच्या वाल्वच्या दुखापतींना बळी पडतात. मुख्यत: हृदयाच्या वाल्वचे कार्य पुनर्संचयित करण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. हे एकतर खराब झालेले वाल्व दुरूस्त करून किंवा कृत्रिम वाल्व बसवून साध्य केलं जातं.