‘गर्भाशयाचा कॅन्सर’ म्हणजे काय ? याची ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’ कोणते ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम

गर्भाशयाचा कॅन्सर म्हणजे काय ?

– गर्भशयात एक आंतरिक आवरण असतं. यालाच एंडोमेट्रीयम म्हटलं जातं. जेव्हा या एंडोमेट्रीयमच्या पेशी या अनियंत्रितपणे वाढतात तेव्हा त्या गर्भाशयाच्या कॅन्सरला कारणीभूत ठरतात.

काय आहेत याची लक्षणं ?

– योनीतील असामान्य रक्तस्त्राव जो जास्त असू शकतो किंवा काही काळादरम्यान असू शकतो.
– मेनोपॉझनंतरही योनीतून रक्तस्त्राव
– पेल्विक वेदना
– डिस्पॅरुनिया
– असामान्य योनी स्त्राव
– वजन कमी होणं
– थकवा
-भूक कमी होणं

काय आहेत याची कारणं ?

– कौटुंबिक इतिहास
– मासिक पाळी लवकर येणं
– वंध्यत्व
– लठ्ठपणा
– हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरपीचा दीर्घकाळ वापर
– ब्रेस्ट कॅन्सरची औषधं

काय आहेत यावरील उपचार ?

1) शस्त्रक्रिया – ही उपचारांची पहिली पायरी आहे. सुरुवातीच्या टप्प्यात आढळल्यास अंडाशय आणि अंडनलिकेसह गर्भाशय काढलं जातं.

2) रेडिएशन थेरपी – सहसा प्रोटॉन किरणांचा वापर पेशींना नष्ट करण्यासाठी केला जातो. काही बाबतीत मोठ्या आकाराच्या ट्युमरला कमी करण्यासाठी रेडिएशन दिलं जातं.

3) हार्मोन थेरपी – तोंडी संप्रेरकांची तयारी केली जाते. यामुळं प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढते किंवा इस्ट्रोजनची पातळी कमी होते. ट्युमरच्या पेशी कमी होतात.

4) किमोथेरपी – तोंडी किंवा इंट्रावेनस किमोथेरेपीटीक एजंट कर्करोगाच्या पेशींना नष्ट करण्यास मदत करतात. किमोथेरेपीटीक औषधे देखील ट्युमर कमी करण्यासाठी मदत करतात. यामुळं सुलभरित्या शस्त्रक्रिया होते.