‘एनर्जी ड्रिंक’ पिण्याची सवय पडू शकते महाग ; तुम्हाला होऊ शकतो हा आजार 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण कोणत्याना कोणत्या कारणानं एनर्जी ड्रिंक घेत असतो. कधी मित्रा सोबत मौज म्हणून, कंटाळा आलाय म्हणून, पार्टीमध्ये, जागरण, प्रवासात अस कोणतेही कारण पुढे करत आपण केव्हाही एनर्जी ड्रिंक घेतो.

परंतु आपणास हे माहित नसतं की या एनर्जी ड्रिंकचा आपल्या शरीरावर, मेंदुवर दूरगामी परिणाम होत असतो. बरेचदा आपण या बद्धल विविध माध्यमा मधून वाचल, पाहिलेल असतं तरी एनर्जी ड्रिंकची एवडी आवड आणि सवय होते व त्याचे परिणाम आपण नंतर भोगत असतो.

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो एनर्जी ड्रिंकच्या अती सेवनाने आपल्या मेंदुवर गंभीर परिणाम होऊन नैराश्य, मनोरुग्नता, अशा स्वरूपाचे आजार होऊ शकतात. आपणास किमान ६ ते ८ तास शांत झोपेची गरज असते परंतु या ड्रिंक मधील कॅफिन मुळे निद्रानाश यासारखा आजारात होते.

पुढे जाऊन आणखी नशा आणणारे पदार्थ यांच्या आहारी जाणे.  असा एकूणच आपल्या शरीरावर व मेंदुवर परिणाम करणाऱ्या एनर्जी ड्रिंक पासून लांबच राहिलेलं बर, आणि आपलं मन आणि शरीर निरोगी राहिल् याची काळजी घेतलेली बरी.

Loading...
You might also like