‘या’ अन्न पदार्थांच्या सेवनाने शरीराला मिळते ऊर्जा

पोलिसनामा ऑनलाईन टीम – शरीराला काम करण्यासाठी ऊर्जेची गरज असते. अशातच आपले आहार योग्य नसल्यास शरीराला लागणारी पुरेशी ऊर्जा मिळत नाही. तर अशावेळी आपल्याला त्वरित ऊर्जा कोणत्या अन्नपदार्थांमधून मिळू शकते ते जाणून घेऊ.

ओट्स
सकाळच्या नाष्टयात नेहमी हाय फायबर युक्त पदार्थांचा सेवन करावा. यामुळे दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते. यामध्ये ओट्स हा उत्तम पदार्थ आहे. ओट्स मध्ये जास्त प्रमाणात फायबर असल्याने शरीराला ऊर्जा मिळते.
Oat

चहा

त्वरित थकवा दूर करण्यासाठी चहा घेणे फायद्याचे असते. चहामध्ये कॅफिन आणि अमिनो एलथीनाइनचे मिश्रण असते ज्यमुळे शरीराला ऊर्जा मिळते.
Tea

फळे

फळांमुळे आपल्या शरीराला जीवनसत्त्व, मिनरल्स, अँटी ऑक्सीडेंट मिळतात. ज्यामुळे शरीराला तत्काळ ऊर्जा मिळते.
Fruits

पाणी
पाण्यामुळे शरीराला जास्त प्रमाणात ऊर्जा मिळते. म्हणून तासा तासाला पाणी पिणे गरजेचे आहे.
Water
सी-वीड सॅलेड
जपानमध्ये तत्काळ ऊर्जेसाठी ऑडामेन, मिजो सूप आणि सी – वीड कोथिंबीरचे सेवन केले जाते. यामध्ये आयोडीनचे प्रमाण जास्त असते. यामुळे ऊर्जाही मिळते.
Seaweed salad

आरोग्यविषयक वृत्त –