Energy Giving Foods | एनर्जीच्या पॉवरहाऊस आहेत ‘या’ 9 गोष्टी, हिवाळ्यात खाल्ल्याने शरीर होत नाही सुस्त

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Energy Giving Foods | हिवाळ्यात नेहमी लोकांना सुस्ती जाणवते. अनेकदा शरीरात पोषकतत्वांच्या कमतरतेमुळे सुद्धा थकवा जाणवतो आणि याचा परिणाम आपल्या रोजच्या कामावर सुद्धा होतो. काही विशेष वस्तूंबाबत आपण जाणून घेणार आहोत, ज्या शरीराला ताबडतोब एनर्जी देण्याचे काम करतात. त्या खाल्ल्यानंतर तुम्ही दिवसभर अ‍ॅक्टिव्ह राहाल. (Energy Giving Foods)

 

1. अंडे (Egg) –
नाश्त्यात अंडे खाल्ल्याने बराच वेळ पोट भरलेले राहते आणि शरीरात एनर्जी राहते. अंड्यात 13 व्हिटॅमिन, मिनरल्स, ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड आणि अँटीऑक्सिडेंट असतात.

 

2. केळी (Banana) –
केळ्यात भरपूर पोटॅशियम, फायबर आणि व्हिटॅमिन असते. यामध्ये कार्ब्जची चांगली मात्रा असते. संपूर्ण दिवस भरपूर उर्जा मिळते.

 

3. ओट्स (Oats) –
ओट्समध्ये प्रोटीन, फायबर आढळते. शुगर कंट्रोल राहते, भूक लवकर लागत नाही. एनर्जी वाढते, वेट लॉससाठी उपयोगी आहे. (Energy Giving Foods)

 

4. रताळे (Sweet Potato) –
रताळे खाल्ल्याने एनर्जी वाढते, रताळ्यामधील फायबर आणि कार्ब्ज पचण्यास उशीर लागतो. यामुळे लवकर भूक लागत नाही. शरीर खुप वेळ अ‍ॅक्टिव्ह राहते.

5. सफरचंद (Apple) –
सफरचंदातील कार्ब्ज, फायबर, नॅचरल शुगरमुळे उर्जा स्तर हळुहळु वाढतो. शरीर जास्त काळ अ‍ॅक्टिव्ह राहते. शरीराला एनर्जी मिळते.

 

6. बीट (Beat) –
बीट शरीराचा उर्जा स्तर वाढवते. यातील अँटीऑक्सीडेंट ब्लड फ्लो वेगाने करते. यातील नायट्रेट नायट्रिक ऑक्साईड वाढवते. यामुळे पेशींना जास्त ऑक्सीजन मिळतो.

 

7. ब्राऊन राईस (Brown Rice) –
ब्राऊन राईसमध्ये पोषकतत्वे भरपूर असतात. यामध्ये फायबर आणि मँगेनीज आढळते, जे कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनला एनर्जीमध्ये बदलते.

 

8. नट्स आणि सीड्स (Nuts and Seeds) –
सुकामेव्यात प्रोटीन आणि फायबरची मात्रा चांगली असते. जी तुम्हाला आतून एनर्जी देण्याचे काम करते. थकवा आणि भूक दूर करते. दिवसभराचा थकवा दूर करायचा असेल आणि उर्जा स्तर वाढवायचा असेल तर मुठभर बदाम, काजू आणि अक्रोड खा.

 

9. पाणी (Water) –
थंडीच्या दिवसात लोक पाणी कमी प्रमाणात पितात. ज्यामुळे कमी एनर्जी जाणवते. या हंगामात स्वताला हायड्रेट ठेवणे खुप आवश्यक आहे. यासाठी दिवसभर जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्ही पूर्ण दिवस अ‍ॅक्टिव्ह राहाल.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Energy Giving Foods | energy giving foods beat fatigue winter season energy healthy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Fenugreek-Methi Leaves Benefits | डायबिटीज रूग्णांसाठी रामबाण मेथीची भाजी, जाणून घ्या हिवाळ्यात खाण्याचे 7 फायदे

Carrot Juice Benefits | हिवाळ्यात गाजर ज्यूसने करा दिवसाची सुरूवात, जाणून याचे 4 जबरदस्त फायदे

Maharashtra Politics | दिवा विझताना तेजोमय होतोच; भाजप-मनसे-शिंदे गटाच्या संभाव्य महायुतीला शिवसेनेचा टोला