100 कोटी रुपये वसुली प्रकरणात ED कडून मनी लाँड्रिग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याला 100 कोटी रुपये वसुलीचा आदेश दिल्याच्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर आता ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध मनी लॉड्रिग प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचे करण्याचे आदेश सचिन वाझे याला दिल्याचा आरोप केला होता. उच्च न्यायालयाने याबाबत चौकशी करुन अहवाल देण्याचा आदेश सीबीआयला दिला होता. सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करुन देशमुख यांच्या मुंबई, नागपूर येथील कार्यालये व निवासस्थानी छापे घातले होते. त्यात सीबीआयने अनेक महत्वाची कागदपत्रे जप्त केली होती.

त्यानंतर आता ईडी सक्रीय झाली असून त्यांनी मनी लाँड्रिगप्रकरणी अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.