ED ला मिळाले ठोस पुरावे, दिल्ली दंगलीच्या आरोपींशी मौलाना सादचं ‘कनेक्शन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने मौलाना मोहम्मद सादची कुंडली तयार केली आहे. मरकजच्या दहा वर्षांपासूनच्या खात्यांची तपासणी केली असता, असे अनेक पुरावे मिळाले आहेत जे मौलाना सादवर फास आवळण्यासाठी पुरेसे आहेत. सूत्रांनुसार, ईडीला दंगलीचा मुख्य आरोपी ताहिर हुसैन आणि राजधानी स्कूलचा व्यवस्थापक फैसल फारूकीशी संबंधीत काही पुरावे सुद्धा मिळाले आहेत. याच कारणामुळे ईडीने मागील काही महिन्यात ताहिर आणि त्याच्याशी सबंधीत अन्य लोकांच्या येथे दोन-दोन वेळा छापेमारी केली.

तपासात समजले की, अवघ्या काही वर्षात मौलाना मोहम्मद साद, ताहिर हुसैन आणि फैसल फारूकी यांनी खुप मोठी संपत्ती जमा केली आहे. ईडीला मौलाना सादच्या बेनामी संपत्तीचे महत्वाचे पुरावे मिळाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार दिल्ली दंगलीचा मास्टरमाईंड फैसल फारूकीच्या राजधानी पब्लिक स्कूलच्या आलीशान इमारतीमध्ये मौलाना मोहम्मद सादचा पैसा वापरण्यात आला आहे. एवढेच नव्हे, फैसलच्या आणखी एका शाळेसह अनेक अन्य संपत्तीमध्ये सुद्धा मौलाना सादने आपल्या काळ्यापैशाची गुंतवणूक अलीमद्वारे केली आहे. अलीम हा सादचा नातेवाईक आहे आणि परदेशी फंडिंगसाठी मरकजशी संबंधीत आहे. पैशाची सर्व देवाण-घेवाण त्याच्या माध्यमातून होते.

अलीम आणि फैसल फारुखीमध्ये दंगलीच्या दरम्यान वारंवार चर्चा झाल्याचे पुरावे सुद्धा कॉल डिटेलच्या रूपात तपास यंत्रणांना मिळाले आहेत. अलीमच्या पुतणीचा विवाह मौलाना सादच्या मुलासोबत झाल्यानंतर तो मरकजमध्ये राहू लागला. यानंतर सादने निजामुद्दीन मरकजच्या व्यवस्थापनाचे सर्व कामदेखील त्याच्याकडे सोपवले. क्राईम ब्रांचशिवाय स्पेशल सेल आणि अंमलबजावणी संचालनालय या तिघांची चौकशी करत आहेत. अशावेळी आता तपास यंत्रणा फैसल आणि मरकजशी संबंधीत खात्यांच्या तपासात जुंपल्या आहेत.

दिल्लीच्या जाकिर नगरच्या ज्या आलीशान कोठीत मौलाना साद मागील तीन महिन्यापासून लपला आहे, ती कोठी तशी तर अलीमची आहे. पण, तपास यंत्रणांना शंका आहे की यामध्ये सर्व पैसा मौलाना सादचाच लावला गेला आहे. अशाप्रकारे अनेक ठिकाणी त्याची कोट्यवधी रूपयांची बेनामी संपत्ती आहे, ईडी मनी लॉन्ड्रिंगचा तपास करत आहे. ईडीने मौलाना सादच्या मुलासह मरकजशी संबंधीत अनेक लोकांची चौकशी केली होती, ज्यामध्ये अलीमचा देखील समावेश आहे.