सुशांत व अंकिता लोखंडेचे 17 पानांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट ED च्या हाती, होणार मोठा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या घटनेला जवळपास दोन महिन्याचा कालावधी लोटला आहे. या कालावधीत बऱ्याच घडामोडी घडल्या. या प्रकरणाचा तपास सध्या वेगळ्या वळणावर येऊन पोहचला आहे. आता या प्रकरणात एक वेगळीच माहिती समोर येतेय. सुशांत सिंह राजपूत आणि त्याची एक्स गर्लफ्रेंन्ड अंकिता लोखंडे यांचे 17 पानांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) हाती लागले असल्याचे वृत्त एका हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे. सोमवारी ईडीने सुशांत व अंकिता यांच्यात झालेले चॅट सीज केले आहे.

सुशांतच्या वडिलांनी सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती विरोधात तीन आठवड्यापूर्वी बिहारमध्ये एफआयआर दाखल केली आहे. याच दरम्यान सुशांतच्या बँक खात्यातून 15 कोटींचा व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर बिहार पोलिसांच्या विनंतीवरून ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करत असताना ईडीला सुशांत आणि अंकिता लोखंडे यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅटची माहिती मिळाली आहे. या आधारावर सुशांतच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यात मोठी मदत मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. याच दरम्यान ईडीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला समन्स जारी करत शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

सुशांत आत्महत्या करुच शकत नाही…

सुशांत आत्महत्या करूच शकत नाही. असे असते तर त्याने कधीच आत्महत्या केली असती. पवित्र रिश्ता ही मालिका सोडल्यानंतर तो तीन वर्षे घरी बसून होता. त्याच्याजवळ काहीच काम नव्हते. बॉलिवूडमध्ये तो स्ट्रगल करत होता. मी कामावर जायचे आणि तो एकटा घरी असायचा. नैराश्य आणि काम मिळत नसल्यामुळे आत्महत्या करायची असती तर त्याने तेव्हाच केली असती, असेही अंकिताने सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like