आता ‘या’ कारणामुळं माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना ईडीचं समन्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे. हवाई उद्योगातील करारातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून २३ ऑगस्ट रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

या कारणाने ईडीकडून चौकशी
तत्कालीन उद्योग सल्लागार दिपक तलवार यांनी तीन आर्थिकदृष्ट्या फायदेशीर हवाई मार्ग एअर इंडियाला मिळवून देण्याऐवजी तीन आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना मिळवून दिले होते. हा गैरव्यवहार २००८-०९ साली झाला होता. त्या बदल्यात त्यांना २७२ कोटी रुपये देण्यात आले होते. त्यावेळी पी. चिदंबरम देशाचे अर्थमंत्री होते. त्यांचे दिपक तलवार यांच्याशी संबंध होते. याच कारणाने सक्तवसुली संचलनालयाने त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

या आधी देखील पी. चिदंबरम यांची आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि एअरसेल मॅक्सिस घोटाळ्याप्रकरणी ईडीने चौकशी केली होती. राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल यांची देखील सक्तवसुली संचलनालयाकडून जूनमध्ये चौकशी करण्यात आली होती.

आरोग्यविषयक वृत्त

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like