×
Homeक्रीडाENG-PAK Cricket | भारतावर राग काढण्यासाठी आता PAK ला खुश करण्यासाठी निघाले...

ENG-PAK Cricket | भारतावर राग काढण्यासाठी आता PAK ला खुश करण्यासाठी निघाले इंग्लंड क्रिकेट बोर्ड, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ENG-PAK Cricket | इंग्रज काल सख्खे नव्हते आणि उद्याही नसणार. संधी मिळताच त्यांनी आपला खरा रंग भारताला दाखवला. मॅनचेस्टर टेस्ट रद्द होण्याच्या रागातून अगोदर तर आयपीएल 2021 मधून त्यांच्या अनेक खेळाडूंनी आपले अंग काढून घेतले. फ्रेंचायजी सोबत केलेला करार मोडला. आणि, तरीही मन न भरल्याने मनातील राग काढण्यासाठी पाकिस्तानला खुश (ENG-PAK Cricket) करण्याचा निर्णय घेतला आहे.

होय, इंग्लंडच्या एका मोठा वृत्तपत्रानुसार, इंग्लंडचे ते खेळाडू आयपीएल 2021 च्या प्लेऑफमध्ये खेळताना दिसणार नाहीत, जे टी20 वर्ल्ड कपचा भाग होते.

महत्वाचे खेळाडू उपलब्ध होणार नाहीत
मॅनचेस्टर टेस्ट रद्द झाल्यानंतर भारताला दुखावणे, आयपीएल संघांना नाराज करण्यासाठी फेकलेला इंग्लंडचा हा दुसरा गुगली आहे. रिपोर्टनुसार, इंग्लंड टीम मॅनेजमेंटची इच्छा आहे की ज्या खेळाडूंना टी20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांनी पाकिस्तानविरूद्ध तिथे होणार्‍या 2 सामन्यांच्या T20 सीरीजमध्ये सहभागी व्हावे.

याचा अर्थ असा की, ऑयन मॉर्गन, मोईन अली, सॅम बिलिंग्ज, सॅम करन, क्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंस्टोन, आदिल रशीद, जेसन रॉय, क्रिस वोक्स, टॉम करन सारखे खेळाडू आयपीएल 2021 च्या प्लेऑफमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध होणार नाहीत.

 

पाकिस्तानला खुश करण्यासाठी निघाला इंग्लंड!

पाकिस्तानमध्ये होणार्‍या टी20 सीरीजकडे इंग्लंड टीम मॅनेजमेंट टी20 वर्ल्ड कपसाठी आपली शेवटची तयारी म्हणून पहात आहे.

टी20 वर्ल्ड कप UAE मध्ये खेळवली जाणार आहे. इंग्लंड बोर्डची इच्छा आहे की, ICC इव्हेंटसाठी निवडलेल्या त्यांच्या सर्व खेळाडूंनी पाकिस्तानविरूद्धच्या सीरीजमध्ये सहभागी व्हावे. मात्र, यासाठी त्यांना खझङ चे प्लेऑफ सामने सोडावे लागतील.

9 ऑक्टोबरला पाकमध्ये इंग्लंड, 10 ऑक्टोबरपासून प्लेऑफ
इंग्लंडच्या टीमला 9 ऑक्टोबरला पाकिस्तानमध्ये पोहचायचे आहे. तर IPL चे प्लेऑफ सामने 10 ऑक्टोबरपासून सुरू होतील. रिपोर्टनुसार, इंग्लंड टीम मॅनेजमेंटला कोणत्याही परिस्थितीत आपल्या खेळाडूंना पाकिस्तानमध्ये खेळवायचे आहे. इंग्लंडची टीम UAE मध्ये 2 वॉर्म अप मॅचसुद्धा खेळेल आणि त्यामध्ये सुद्धा ECB ला आपले सर्व खेळाडू हवे आहेत.

BCCI कडे केली तक्रार
यापूर्वी आयपीएल 2021 मधून बेन स्टोक्स, क्रिस वोक्स, डेव्हिड मालन सारख्या खेळाडूंनी आपली नावे परत घेतली.
इंग्लिश खेळाडूंच्या या पावलाने आयपीएल फ्रेंचायजी नाराज दिसत आहेत.
त्यांनी याबाबत BCCI कडे तक्रार सुद्धा केली आहे.

खेळाडूंनी अचानक कळवला नकार
IPL संघांनुसार गुरुवारपर्यंत सर्वकाही ठीक होते.
इंग्लंडच्या खेळाडूंशी त्यांची चर्चा सुद्धा झाली होती.
ते सर्व येण्यास तयार होते.
परंतु, पुन्हा शनिवारी अचानक त्यांनी वैयक्तिक करणे सांगत आयपीएल 2021 मध्ये सहभागी होण्यास नकार दिला.

Web Titel :- ENG-PAK Cricket | ipl 2021 t20 world cup bound england players will miss ipl playoffs reports

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 239 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Thane Anti Corruption | 4 लाखाची लाच घेऊन पुन्हा 1 लाखाची मागणी, सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Sanjay Rathod | मंत्रीपदाचा राजीनामा का दिला?; संजय राठोड यांनी दिलं स्पष्टीकरण

Must Read
Related News