Eng vs Pak Final | पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमच्या नावावर लाजीरवाणा विक्रम, जाणून घ्या काय आहे तो विक्रम?

पोलीसनामा ऑनलाईन टीम : Eng vs Pak Final | आज पाकिस्तान (Pakistan) आणि इंग्लंड (England) यांच्या T-20 वर्ल्डकपमधील (T- 20 World Cup) अंतिम लढत पार पडत आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याला काही चांगली कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेमध्ये त्याच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. काय आहे तो विक्रम जाणून घेऊया… (Eng vs Pak Final)

 

बाबरनं मारली नाही एकही सिक्सर

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये बाबरनं 7 मॅचमध्ये एका अर्धशतकासह 124 धावा केल्या. पण या 7 मॅचमध्ये त्याला एकही सिक्स मारता आला नाही. वर्ल्ड कपआधी बाबर चांगलाच फॉर्मात होता. पण वर्ल्ड कपमध्ये त्याला त्याचा फॉर्म कायम राखता आला नाही. बाबर आझम आयसीसी रँकिंगमध्ये (ICC Ranking) बऱ्याच वेळ अव्वल स्थानावर होता. पण वर्ल्ड कपमधल्या कामगिरीमुळे त्याच्या रँकिंगमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. (Eng vs Pak Final)

 

फायनलमध्ये पाकिस्ताची निराशाजनक कामगिरी

फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानी फलंदाज जास्त वेळ टिकू शकले नाही. ठराविक अंतराने त्याच्या विकेट पडत गेल्या आणि पाकिस्तानचा डाव कोलमडला. पाकिस्तानला 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 137 धावाच करता आल्या. या महत्वाच्या लढतीत शान मसूदनं (Shan Masood) सर्वाधिक 38 धावा केल्या. तर बाबर आझमनं 32 धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त अजून कोणाला फारशी चमक दाखवता आली नाही. या सामन्यात सॅम करनने 3 (Sam Curran), आदिल रशिदने 2 (Adil Rashid) आणि बेन स्टोक्सने 1 (Ben Stokes) विकेट घेतली.

 

 

Web Title :- Eng vs Pak Final | babar azam did not hit single six in entire t20 world cup

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा