Eng vs Pak | इंग्लंड-पाकिस्तान सामन्यात बॉल लागल्यामुळे भर मैदानात कळवळला अम्पायर, Video आला समोर

लाहोर : वृत्तसंस्था – सध्या पाकिस्तान आणि इंग्लंड (Eng vs Pak) यांच्यात टी 20 मालिका (T20 Series) सुरु आहे. एकूण सात सामन्यांची हि मालिका आहे. यामधील 6 सामने झाले असून 1 सामना अजून बाकी आहे. 6 पैकी 3 सामने पाकिस्ताननं (Pakistan) तर 3 सामने इंग्लंडनं (England) जिंकले आहेत. त्यामुळे 7 वा सामना हा दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे. लाहोरमध्ये झालेल्या 6 व्या टी 20 सामन्यादरम्यान पाकिस्तानचे अम्पायर अलिम डार (Umpire Aleem Dar) यांना मात्र चांगलाच फटका बसला. आणि भर मैदानात त्यांना आपला पाय चोळत बसावा लागला.

 

काय घडले नेमके?
पाकिस्तानच्या डावात 6 व्या ओव्हरमध्ये कॅप्टन बाबर आझम (Captain Babar Azam) आणि हैदर अली (Haider Ali) बॅटिंग करत होते.
या ओव्हरच्या 5 व्या बॉलवर हैदर अलीनं पूलचा फटका खेळला. पण हैदर अलीचा हा फटका स्क्वेअर लेगवर असलेल्या अलीम दार यांना चुकवता आला नाही.
आणि बॉल थेट दार यांच्या पायावर लागला.
हा फटका एवढा जोरदार होता कि अलिम दार थोडा वेळ कळवळले आणि मैदानातच पाय चोळताना दिसले.
त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 

या सामन्यात दोन्ही बाजूने तुफान फटकेबाजी करण्यात आली.
या मालिकेतला 7 वा आणि अखेरचा सामना 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
दोन्ही संघांनी 3-3 सामने जिंकल्यामुळे रविवारी होणार सामना दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

 

Web Title :- Eng vs Pak | umpire alim dar gets hit on leg by pakistani batsman haider ali in eng vs pak t20 match

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांसाठी लाभदायक आहे का दहीचे सेवन? जाणून घ्या ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी काय खावे

Vitamin D Supplements घेत असाल तर जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी, अन्यथा होऊ शकते नुकसान

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार अजय विटकर व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 98 वी कारवाई