भीक मागत होता ‘इंजिनिअर’, वास्तव समोर आल्यानंतर सरकारनं घेतला ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ओडिशामधील पुरी या शहराला भिकारी मुक्त करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने मोठी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत इंजिनिअर असलेल्या आणि भिकारी झालेल्या गिरिजा शंकर मिश्रा यांना त्यांच्या घरी आणण्यात आले आहे. 52 वर्षीय गिरिजा शंकर मिश्रा पुरी येथील जगन्नाथ मंदिरासमोर भिकाऱ्यांसोबत बसून भीक मागताना दिसले तेव्हा ही बाब चर्चेत आली. गिरिजा शंकर मिश्रा यांनी बीएससी पूर्ण केल्यानंतर नामांकित संस्थेकडून प्लास्टिक अभियांत्रिकीचा पदविका प्राप्त केली. ते हैदराबादमधील एमएनसीमध्ये अभियंता म्हणून काम करायचे .

हे प्रकरण तेव्हा उजेडात आले जेव्हा पार्किंग च्या मुद्द्यावरून एका रिक्षाचालकासोबत त्यांचे भांडण झाले. तेथील काही जणांनी त्यांना मारहाण केली. त्यांना बराच मार देखील लागला होता. त्यानंतर गिरीजा शंकर मिश्रा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. ते सुशिक्षित असल्याचे दर्शविणारी तक्रार सुबकपणे लिहिली गेली. यानंतर पोलिसांना त्यांची सत्यता कळताच ते स्तब्ध झाले.

पुरीसारखे पर्यटन स्थळ भिकार्‍यांपासून मुक्त करण्यासाठी ओडिशा सरकारने अशा सर्व लोकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा लोकांना निलाद्री निलय येथे हलविण्यात येईल व त्यांना तेथे खायला, कपडे, अंथरूण, उपचार सुविधा मोफत देण्यात येतील. या कामासाठी राज्य सरकारने पाच स्वयंसेवी संस्था निवडल्या आहेत, जे भिक्षुकांना ओळखण्यात समाज कल्याण विभागाला मदत करीत आहेत. या स्वयंसेवी संस्थांना भिखाऱ्याना चांगली राहण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीमागे दरमहा 34०० रुपये दिले जातील.या अहवालानुसार ३ मार्चपासून सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत पहिल्या पाच दिवसांत 146 भिकाऱ्यांची ओळख पटली गेली आणि पुनर्वसन केले गेले आहे.