पोलिसांच्या दंड भरण्याच्या धमकीमुळं इंजिनिअरचा रस्त्यावरच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नव्या मोटार वाहन कायद्यानुसार वाहतुकीच्या नियमावरील दंडाच्या रकमेत चांगलेच बदल करण्यात आलेले आहेत. जुन्या दंडाच्या तुलनेने आता नव्या कायद्यानुसार वाहतुकीचे नियम तोडल्यास कडक दंड भरावा लागणार आहे. नोयडा येथील एका इंजिनिअर वाहतुकीचा नियम तोडला असता वाहतूक पोलिसांनी चलन फाडण्याची धमकी दिल्याने तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

नोयडा येथील इंदिरापुरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. गौरव शर्मा असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. गौरव आपल्या वडिलांसोबत कारमध्ये प्रवास करत होता. इंदिरापुरजवळील वाहतूक पोलिसांनी त्याला थांबायला लावला आणि गाडीवर दांडुके मारायला सुरुवात केली. घाबरलेला गौरव रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडला. रस्त्यावरील नागरिकांच्या मदतीने त्याला दवाखान्यात हलवण्यात आले.

डॉक्टरांनी त्याची हालत नाजूक असल्याचे सांगताच त्याला दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला होता. गौरवच्या वडिलांनी यावर तक्रार दाखल केली असून पोलीस उपअधीक्षक वैभव कृष्ण यांनी यावर निष्पक्षतेने कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.