धक्कादायक …! पुण्यातील इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीला मुंबईत नेऊन महिनाभर बलात्कार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीला मुंबईला बोलावून तिला घरात डांबून  बलात्कार  केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी सय्यद आमिर मन्सूर हुसेन उर्फ शिरोज याला अटक करून न्यायालयात हजर केली असता त्याला १० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
[amazon_link asins=’B01FM7GGFI,B077PWBC7J,B078BNQ313,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1de524b7-b1a0-11e8-8972-f7c88a813849′]
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सय्यद आणि संबंधित तरुणी यांची काही महिन्यापूर्वी  फेसबुकवर ओळख झाली होती . त्यांची चांगली मैत्री जमली त्यानंतर जुलै महिन्यात ओशिवरा येथील घरी जेवायला बोलाविले. जेवण झाल्यावर ती पुन्हा पुण्याला जायला निघाली तेव्हा मात्र सय्यद ने तिला रात्रभर थांबण्यास सांगितले.दुसऱ्या दिवशी ती निघाली त्यावेळी सय्यद याने तिला खोलीत बंद केले. महिनाभर घरात डांबून त्याने बलात्कार केल्याचा तसेच सुमारे ४० अश्लील क्लिप बनवल्याचा आरोप या तरुणीने तक्रारीत केला आहे.
सय्यदच्या आईचा सहभाग ? 
ही तरुणी घरातून पळून जाऊ नये यासाठी सय्यद याने तिचे कपडे फाडून टाकले, केस कापून तिचे टक्कल केले. सय्यद याच्या आईसमोरच महिनाभर हा घृणास्पद प्रकार सुरू होता. त्यामुळे तिचा यात सहभाग आहे का, याचाही तपास पोलिस करीत आहेत.
मांजरीमुळे झाली सुटका 
सय्यद याच्या घरात दहा ते बारा मांजरी आहेत. गेल्या आठवड्यात त्यापैकी एक मांजर बाल्कनीतून खाली पडली. सय्यद याच्या आईने या तरुणीला सय्यदचे कपडे दिले आणि मांजरीला आणण्यासाठी खाली पाठविले. याच संधीचा फायदा घेऊन ये तरुणीने पळ काढला. बहिणीशी संपर्क करून पुणे गाठले. पुणे पोलिसांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर या तरुणीला घेऊन पुणे पोलिस मुंबईत आले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
 जाहिरात