नोटांच्या बंडलांवर झोपत होता ‘हा’ इंजिनिअर, नोटांचे बंडल पाहून अधिकार्‍यांची उडाली ‘भंबेरी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारमधील एक अभियंता नोटांच्या बेडवर झोपत असल्याचे तपास यंत्रणांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये उघडकीस आले. ज्यावेळी अधिकाऱ्यांनी या अभियंत्याच्या घरी छापा मारला त्यावेळी तो झोपत असलेल्या बेडमध्ये पैशांचे बंडल सापडले. पैशांचे बंडल पाहून अधिकारी देखील चकीत झाले. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी बँका बंद असल्याने जप्त केलेली रक्कम आरबीआयच्या विशेष आदेशानुसार बँकेत जमा करण्यात आली.

अभियंता सुरेश प्रसाद आणि रोखपाल शशिभूषण कुमार यांना १४ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. पटण्याजवळील बिहटा ते बिक्रम दरम्यान होणाऱ्यां रस्त्याच्या करारासाठी लाच स्विकारण्यात आली होती. सुरेश प्रसाद आणि कुमार यांनी २८ लाखांची लाच मागितली होती. त्यापैकी १४ लाखांच्या पहिला हप्ता देण्यासाठी सुरेश प्रसादने ठेकेदाराला घरी बोलावले होते. पहिला हप्ता स्विकारताना दोघांना सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले.

पोलीस उपायुक्त गोपाल पासवान यांनी सांगितले, साज इन्फ्राकॉम प्रोजेक्ट लिमिटेडचे अखिलेश कुमार जयस्वाल यांचे बिहाटा ते बिक्रम दरम्यान रस्त्याचे काम सुरु आहे. या रस्त्याच्या करारासाठी अभियंता सुरेश प्रसाद आणि शशिभूषण कुमार यांनी २८ लाखांची लाच मागितली. त्यातील १४ लाखांचा पहिला हप्ता देण्याचे ठरले होते. १४ लाखांची लाच स्विकारताना सापळा रचून दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. या दोघांच्या घराची झडती घेतली असता दोन करोड पेक्षा जास्त रक्कम जप्त करण्यात आली आहे.

अभियंता सुरेश प्रसाद याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरामध्ये करोडो रुपयांची रोकड सापडली. ही रक्कम मोजण्यासाठी मशिन मागवण्यात आली. प्रसाद याच्या बेडमधून ही रक्कम जप्त करण्यात आली. तसेच घरामध्ये इतर ठिकाणी लपवून ठेवलेली रक्कम देखील अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. प्रसाद याच्या घरातून २ कोटी ४० लाखांची रोकड जप्त करण्यात आली तसेच अनेक जमिनीची कागदपत्रे आणि अन्य वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

आरोग्य विषयक वृत्त-
लसणाच्या सालीत आहेत ‘हे’ खास गुणधर्म, होतात खास फायदे
मेंदू सदैव सक्रीय ठेवण्यासाठी ‘या’ ५ सवयी आवश्यक
पहाटे सेक्स केल्याने हार्ट अटॅकचा धोका होतो कमी

You might also like