Engineer Suicide In Aurangabad | ‘तेरे बिन नही जीना मर जाना ढोलना’ ! इंजिनियर तरुणाची आत्महत्या, परिसरात प्रचंड खळबळ

औरंगाबाद / पैठण : पोलीसनामा ऑनलाइन – Engineer Suicide In Aurangabad | इंजिनियरचे शिक्षण घेतलेल्या तरुणाने राहत्या घरामध्ये गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या (Engineer Suicide In Aurangabad) केल्याची धक्कादायक घटना आज (सोमवार) सकाळी उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेला इंजिनियर तरुण मुळचा पंढरपुरचा (Pandharpur) असून तो सध्या औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad Crime) पैठण तालुक्यातील (Paithan Taluka) पिंपळवाडी (Pimpalwadi) परिसरात भाड्याच्या घरात राहत होता. निखिल दत्तात्रय चौडांळे Nikhil Dattatraya Chaudanle (सध्या रा. आदर्श नगर, पिंपळवाडी, ता. पैठण) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निखिल हा पैठण एमआयडीसी (Paithan MIDC) मध्ये एका कंपनीत इंजिनियर म्हणून काम करत होता. आज सकाळी त्याने आत्महत्या (Engineer Suicide In Aurangabad) केल्याचे उघडकीस आले. निखिल ज्या घरात रहात होता त्या ठिकाणी काही प्रेमपत्र (Love Letter) मिळाली आहेत. त्यामुळे निखिलने प्रेमप्रकरणातून (Love Affair) आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

निखिलच्या खोलीत आढळलेल्या प्रेमपत्रामध्ये ‘तेरे बिन नही जीना मर जाना ढोलना’ असे हिंदी चित्रपटातील (Hindi Movies) गाण्याचे बोल लिहिण्यात आले आहेत. पोलिसांनी सर्व पत्रे ताब्यात घेतली आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पैठण शासकीय रुग्णालयात (Paithan Government Hospital) पाठवला. निखिलचे नातेवाईक आल्यानंतर त्याने आत्महत्या का केली? त्याचे कोणत्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते का? याचा उलगडा होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहेत.

पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल (SDPO Dr. Vishal Nehul)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे (API Bhagwat Nagargoje),
पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौरे (PSI Dilip Chaure), पोलीस कर्मचारी मंचरे करीत आहेत.

 

Web Title :- Engineer Suicide In Aurangabad | aurangabad crime news engineer youth commits suicide in paithan


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chitra Wagh-Satej Patil | चित्रा वाघ यांचा सतेज पाटलांना सवाल; म्हणाल्या – ‘मी तुमच्या बायकोवर बोलत नाही, तुम्ही माझ्या नवऱ्याला मध्ये का आणता?’

Money Laundering Case | अनिल देशमुख यांच्यासह 2 सचिव अन् सचिन वाझे केंद्राच्या ताब्यात; CBI चे पथक कारागृहात दाखल

Devendra Fadnavis | संजय राऊतांचं नाव घेत फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘वेश्यांना द्यायच्या पैशातही डल्ला मारणार्‍यांना…’