‘अभियांत्रिकी’च्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – विशालनगर येथील अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे.

अक्षय माने असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. अक्षय हा मुळचा ताडसोन्ना गावाचा राहणारा आहे. तो औरंगाबाद येथील जवाहरलाल नेहरु इंजिनिअरिंग महाविद्यालयात तृतीय  वर्षात शिक्षण घेत होता. अभ्यासाच्या अति तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

अक्षय माने याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पोलीस अधिक माहिती घेत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/