इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने गळा कापून केली आत्महत्या, प्रचंड खळबळ

इंदौर : पोलीसनामा ऑनलाइन –   येथील एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने गळा कापून घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. या तरुणीला काही दिवसांपूर्वी मायग्रेनचा त्रास सुरु झाला होता. तिच्यावर उपचारही सुरु होते.

या विद्यार्थिनीचे वडील एसी रिपेअरिंग आणि इन्स्टॉलेशनचे काम करतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्नीचर रिपेअर करण्यासाठी एका कारागिराला त्यांनी घरी बोलावले होते. या कारागिराने रिपेअरिंगचे सामान घरात ठेवले आणि मदतनीसांना आणण्य़ासाठी गेला होता. दरम्यान दुसरी मुलगी बाथरुममधून अंघोळ करून बाहेर आली तेव्हा आपली बहीण रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तसेच भिंतीवर फरशीवर रक्ताचा सडा पडला होता. हे भयानक दृश्य पाहून ती आरडाओरडा करू लागली. मुलीने आपल्या वडिलांना कळवले. वडील तातडीने घरी पोहोचताच त्यांना मृतदेहाजवळ इलेक्ट्रीक कटर ठेवला होता आणि त्याची वायर प्लगला लावल्याचे दिसले. वडील आल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विद्यार्थिनीला काहीतरी सांगायचे होते. मात्र, गळा कापल्याने तिचा आवाज निघत नव्हता. थोड्याच वेळात तिचा मृत्यू झाला.

२० वर्षांपूर्वी विद्यार्थिनीच्या आईचे निधन झाले होते. त्यामुळे तिन्ही मुलींना वडिलांनीच वाढविले होते. त्यांना एक भाऊ देखील होता. परंतू त्याचा कॅन्सरमुळे तीन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. पोलीस अधिकारी आर पी मालवीय यांनी सांगितले की,काही महिन्यांपूर्वीच विद्यार्थीनीला मायग्रेनचा त्रास असल्याचे समोर आले होते. तिने स्वत:चा गळा कापला आहे. हे प्रथमदर्शनी दिसत आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात असून तपास सुरु आहे.