इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने अनेक विद्यार्थी आत्महत्या करत असतात. अशाच प्रकारची आत्महत्या केल्याची घटना बीडमधील अंबेजोगाई शहरात घडली आहे. गणेश तुकाराम कराड (वय २४) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. इंजिनिअरींगच्या परीक्षेत एका विषयात नापास झाल्याने त्याने आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या परीक्षेत तो एका विषयात नापास झाल्याने मानसिक तणावाखाली होता. यामुळेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे. गणेश पुण्यातील एका इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शिकत होता. नापास झाल्याने तो गावाकडे गेला होता. त्यानंतर त्याचे आईवडील शेतात गेल्याने घरी कोणी नसताना त्याने साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

सर्दीची ‘अ‍ॅलर्जी’ का होते ? जाणून घ्या यामागील कारणे

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी प्या, आरोग्य सुधारेल