‘इंजिनीअर्स डे’ 2020 : ‘हे’ आहेत भारतातील टॉप 10 इंजिनीअरिंग कॉलेज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारताचे महान इंजिनीअर आणि भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन 15 सप्टेंबर हा अभियंता दिन म्हणजेच इंजिनिअर्स डे म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात उत्तमोत्तम अभियंते घडविणारे भारतातले सद्यस्थितीतील टॉप 10 इंजिनीअरिंग संस्था कोणत्या आहेत.

यंदाच्या जून महिन्यात भारतातील शिक्षण संस्थांची रँकिंग जाहीर झाली आहे. एनआयआरएफ इंडिया रँकिंग 2020 पुढील संस्थांना भारतातील टॉप 10 इंजिनीअरिंग संस्थांच्या यादीत स्थान मिळाले. अध्यापन, शिक्षण आणि साधने, संशोधन आणि व्यावसायिक प्रॅक्टिस, पदवीधर आणि सर्वसमावेशकता या पाच मापदंडाच्या आधारे एनआयआरएफद्वारे संस्थांचे रँकिंग केले जाते.

1. भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास
2. भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली
3. भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई
4. भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर
5. भारतीय तंत्रज्ञान संस्था, खडगपूर
6. भारतीय तंत्रज्ञान संस्था, रुरकी
7. भारतीय तंत्रज्ञान संस्था, गुवाहाटी
8. भारतीय तंत्रज्ञान संस्था, हैदराबाद
9. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, तिरुचिराप्पल्ली
10. इंडियन इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, इंदूर