भारतरत्न डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला गुगलकडून अनोखा सलाम!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

गुगल नेहमीच डुडलच्या माध्यमातून महत्वाच्या व्यक्तींचा आणि त्यांच्या कायार्चा सन्मान करत असते. आज इंजिनिअर्स डे असल्याने जगभरात तो उत्साहात साजरा केला जात आहे. गुगलनेही या खास दिवसाचे औचित्य साधत भारतरत्न डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त एक खास डूडल तयार केले आहे. त्यांच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाला या डुडलच्या माध्यमातून सलाम करण्यात आला आहे.

डॉ. विश्वेश्वरय्या यांचं पूर्ण नाव डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या असे आहे. १५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस इंजिनिअर्स डे म्हणून साजरा होतो. दक्षिण भारतातील मैसूर, कर्नाटकला विकसित आणि समृद्धशाली क्षेत्र बनवण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. गुगलने साकारलेल्या डूडलमध्ये विश्वेश्वरय्या यांचे चित्र रेखाटण्यात आले आहे. तसेच एक पूल दिसत असून, त्यावर गुगल ही अक्षरे स्पष्टपणे दिसत आहेत. अतिशय कलात्मकपणे हे डूडल गुगलने तयार करण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B06ZZB71TB,B07G5BTYC2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4eabeeaf-b8b2-11e8-8d10-1fed2fa13dd2′]
डॉ़ विश्वेश्वरय्या यांनी पुण्यातील कॉलेज आॅफ इंजीनियरिंगमध्ये प्रशिक्षण घेतले होते. आंतरराष्ट्रीय इंस्टिट्युट आॅफ सिव्हिल इंजिनियर्स या लंडन स्थित संस्थेचे सन्माननीय सदस्यत्व, तर इंडियन इंस्टिट्युट आॅफ सायन्स च्या बंगलोर शाखेची फेलोशिप त्यांना मिळाली होती. भारतरत्न बरोबरच नाईट कमांडर आॅफ दी आॅर्डर आॅफ दी इंडियन एंंपायर असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते.
त्यांनी ‘सांडव्याची स्वयंचलीत पूरनियंत्रण द्वार प्रणाली’ विकसीत केली व त्याचे पेटेंट घेतले जी १९०३ मध्ये पहिल्यांदा पुण्यातील खडकवासला धरणास लावण्यात आली. या द्वारे,धरणातील साठ्याची पूरपातळी,पूर आल्यावर धरणास कोणताही धोका न होता, उच्चतम स्थितीस वाढविण्यास वापरण्यात आलीत. या द्वारांच्या कामात मिळालेल्या यशामुळे,ती प्रणाली ग्वाल्हेर व कृष्णराज सागर धरण म्हैसूर येथे बसविण्यात आली. विशाखापट्टणम बंदरास समुद्री पाण्यापासुन गंजरोधक करण्याची प्रणाली तयार करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.

सर मो. विश्वेश्वरैया यांनी,कावेरी नदीवर कृष्णराजसागर धरण बांधण्याच्या प्रस्तावापासुन ते उदघाटनापर्यंत सर्व कामांची देखरेख केली.या धरणाचे बांधकामाने,ते बांधल्या गेल्याच्या वेळचे,आशियातील सर्वात मोठे सरोवर निर्माण झाले. त्यांना यामुळे, ‘म्हैसूर राज्याचे पिता’ म्हणून ओळखले जायचे.त्यांचे म्हैसूर राज्याचे नोकरीदरम्यान,त्यांनी सरकारच्या नियंत्रणा खालील म्हैसूर सोप फॅक्टरी,,किटकनाशक प्रयोगशाळा,भद्रावती आयर्न व स्टील वर्कस्,श्री जयचमाराजेन्द्र पॉलीटेक्निक इंस्टीट्युट,बंगलोर ?ग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी,स्टेट बँक आॅफ मैसुर,सेंचुरी क्लब,मीसुर चेंबर आॅफ कॉमर्स असे अगणीत औद्योगीक प्रकल्प सुरु केले. त्यांनी उद्योगात खाजगी गुंतवणुकीवर भर दिला.ते, प्रामाणीकपणा, वेळेचे नियोजन,व एखाद्या कामात पूर्ण समर्पणासाठी ओळखले जात होते. तिरुमला-तिरुपती दरम्यानच्या रस्तेबांधणीत हे त्यांनी योगदान केले.

[amazon_link asins=’B01DEWVZ2C,B01J82IYLW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dd20e574-b8b2-11e8-a37d-8bd2f538c940′]