Video : ‘कॅप्टन कूल’ धोनीची कॉपी करणे सोपे नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा फलंदाज महेंद्रसिंग धोनी याच्या फलंदाजीच्या कौशल्याविषयी कुणालाच शंका नाही, त्याचप्रमाणे त्याच्या यष्टिरक्षणाच्या कौशल्यालाही तोड नाही. याच कौशल्याची आठवण करून देणारा प्रकार काल पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात खेळवल्या गेलेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात घडला. या सामन्यात इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशीद याने धोनीची स्टाईल कॉपी करण्याच्या प्रयत्न केला. मात्र यात तो यशस्वी झाला कि नाही ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता.

प्रसंग असा आहे कि, पाचव्या एकदिवसीय सामन्याच्या २७व्या षटकात हा प्रसंग घडला. पाकिस्तानचा कर्णधार सर्फराजने रशीदच्या गोलंदाजीवर चेंडू हलकाच टोलवला आणि त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला असलेला बाबर रन घेण्यासाठी धावला. पण, सर्फराजने त्याला माघारी जाण्यास सांगितले आणि खेळपट्टीच्या मध्यभागात आल्यानंतर तो माघारी येण्यासाठी परतला. तेव्हा जोस बटलरने चेंडू रशीदच्या दिशेने फेकला आणि रशीदने धोनी स्टाईलने बाबरला धावबाद केले. या सामन्यात बाबर ८३ चेंडूंत ८० धावा करून माघारी परतला. सर्फराजने ८० चेंडूंत ९७ धावांची खेळी केली, परंतु त्याला विजय मिळवून देता आला नाही.
दरम्यान या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पाकिस्तानला ३५३ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ २९७ धावाच करू शकला.