इंग्लंडचा ‘वन डे’ मालिकेत भारताला नमवत शानदार विजय

लीड्स : पोलीसनामा  ऑनलाईन 

इंग्लडने भारताचा आठ विकेट्सने धुव्वा उडवत वने डे सामन्यात २-१ ने पराभव केला. गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर जो रुट  आणि कर्णधार इयॉन मॉर्गर यांच्या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने निर्णायक तिसऱ्या सामन्यात विजय प्राप्त केला आहे. या शानदार विजयासह इंग्लंडने तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकली. प्रथम फलंदाजी करणा-या भारताला ५० षटकात ८ बाद २५६ धावांवर रोखल्यानंतर इंग्लंडने ४४.३ षटकात २ बाद २६० धावा करत बाजी मारली.

[amazon_link asins=’B0797PX6WF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3dc936bb-8a4a-11e8-a1b8-9735af43e28b’]

ज्यो रुटने नाबाद १०० धावांची, तर मॉर्गनने ८८ धावांची खेळी उभारली. विजयासाठी एका धावाची गरज होती आणि रुटला शतकासाठी चार धावांची. रुटने चौकार ठोकत शतक पूर्ण केलं. हेडिंग्ले स्टेडियमवर भारतीय संघ अपयशी ठरला. फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केल्यानंतर इंग्लंडने एकहाती वर्चस्व राखताना आरामात बाजी मारत मालिकाही जिंकली.फलंदाजीत आक्रमक फटकेबाजी केलेल्या शार्दुल ठाकूरने भारताला पहिले यश मिळवून देताना बेयरस्टॉला बाद केले. त्याने १३ चेंडूत ७ चौकारांसह ३० धावांचा तडाखा दिला. यानंतर काहीवेळात विन्सही धावबाद झाला. विन्सने २७ चेंडूत ५ चौकारांसह २७ धावा केल्या. यावेळी भारतीय गोलंदाज सामन्यात रंग भरणार असे दिसत होते.परंतु, रुट आणि मॉर्गन यांनी तिस-या गड्यासाठी १८६ धावांची नाबाद भागीदारी करत भारताच्या हातून सामना काढून घेतला. मॉर्गननेही १०८ चेंडूत ९ चौकार व एका षटकारासह नाबाद ८८ धावा केल्या. या दोघांनी शांतपणे फलंदाजी करत भारतीयांना यश मिळू दिले नाही. भारतीय गोलंदाज या दोघांना रोखण्यात पुर्णपणे अपयशी ठरले. रुट – मॉर्गन यांनी अनेक वेळा भारताला चुका करण्यास भाग पडले. पहिल्या दोन सामन्यांत चमकलेले युझवेंद्र चहल व कुलदीप पवार ही फिरकी जोडीने  या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करू शकले नाहीत.

धवनने चांगली सुरुवात केली. परंतु, १८व्या षटकात तो धावबाद झाला. कोहली आणि धवन यांनी ७१ धावांची भागीदारी केली. धवनने ४९ चेंडूत ७ चौकारांसह ४४ धावा काढल्या. दिनेश कार्तिक २२ चेंडूत २१ धावा करुन परतला. दरम्यान कोहलीने एक बाजू लावून धरल्याने इंग्लंडचे गोलंदाज दबावाखाली होते.

राशिदने इंग्लंडला सर्वात मोठे यश मिळवून देताना कोहलीला  मात्र चितपट केले. त्याने ७२ चेंडूत ८ चौकारांसह ७१ धावा फटकावल्या. यानंतर भारतीय संघाची धावगती कमालीची खालावली. पुन्हा एकदा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडून संथ खेळी झाली. त्याला ६६ चेंडूत ४ चौकारांसह ४२ धावा काढता आल्या. सुरेश रैना केवळ एक धाव काढून तंबूत परतला.