ऐतिहासिक ! सलग 7 दिवस सुरू होता क्रिकेट ‘मॅच’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेटचा सामना हा साधारण एक दिवसाचा असतो. आणि कसोटी सामना पाच दिवस खेळवला जातो. मात्र इंग्लंडमधील एका क्लबने सलग सात दिवस सामना खेळून नवीन विश्वविक्रम केला आहे. या सामन्यात बेडफॉर्डशरच्या या क्लबने पाऊस वारा यांची कसलीही तमा ना बाळगता सलग सात दिवस खेळत राहिले. या क्लबच्या 24 खेळाडूंनी सलग 168 तास क्रिकेट खेळून क्रिकेट क्षेत्रात एक नवीन पराक्रम केला आहे. त्यानंतर आता या विक्रमाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

क्लबचा कर्णधार जॉर्ज हटसनने या रेकॉर्डविषयी माहिती देताना सांगितले कि, आम्ही मागील 9 महिन्यांपासून या रेकॉर्डसाठी तयारी करत होतो. यात 24 खेळाडूंनी सतत खेळून 168 तास खेळण्याचा विक्रम करायचा होता. आणि अखेर त्यामध्ये आम्हाला मागील आठवड्यात आम्हाला यश आले. याविषयी अधिक बोलताना त्याने सांगितले कि, या सात दिवसांमध्ये खेळाडू दररोज 21 तास मैदानावर असत. ते केवळ दोन तासांची झोप घेत असतं. त्यानंतर आम्हाला मोठ्या प्रमाणात थकवा जाणवत होता. मात्र आता मागे वळून पाहता आम्हाला हा विक्रम नोंदविल्याचा अभिमान वाटतो.

दरम्यान, या विक्रमाची नोंद गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यामध्ये पडताळणी केल्यानंतर आणि चौकशी केल्यानंतर या विक्रमाची नोंद करता येणार आहे. त्याचबरोबर हा सलग सात दिवस चाललेला सामना एका चॅरिटी संस्थेला मदत देण्यासाठी खेळवण्यात आला होता.

आरोग्यविषयक वृत्त 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like