धोनीच्या लष्करी प्रशिक्षणावर हसल्याने इंग्लंडचा माजी खेळाडू ‘ट्रोल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विश्वचषक २०१९ नंतर भारतीय संघ लगेचच वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड होण्याआधीच कॅप्टन कुल महेंद्र सिंह धोनीने माघार घेतली. त्याने दोन महिने क्रिकेटपासून दूर राहण्याची इच्छा बीसीसीआयकडे व्यक्त केली होती. त्यानंतर धोनी दोन महिने काय करणार यावर चर्चाही झाल्या. तो लष्करासोबत काम करणार असल्याचेही समोर आले. धोनीच्या या निर्णयावर इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड यांनी थट्टा केली आहे. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांनी लॉयड यांना चांगलेच ट्रोल करत त्यांच्या हसण्यावर उत्तर दिले आहे.

स्काय स्पोर्ट्सने दिलेल्या धोनीच्या बातमीवर लॉयड यांनी हसण्याची इमोजी टाकली. त्यावर लॉयड यांना धोनीच्या चाहत्यांनी सुनावले आहे. धोनी हा खरा वर्ल्डकप विनर आहे, तुमच्यासारखा विकत घेतलेला वर्ल्डकप नाही, असा टोला एका चाहत्याने लगावला आहे. तर एका चाहत्याने लॉयड यांची तुलना धोनीशी करत त्याला ट्रोल केले आहे. धोनीच्या खेळाएवढी तुझी किर्तीही नाही. धोनीच्या करिअरमधील अर्ध्या स्कोर एवढे तुझ्या पूर्ण करिअरचा स्कोर असेल, असं म्हणत त्याला ट्रोल केले आहे.

दरम्यान, धोनी भारतीय लष्करातील पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य आहे. त्याला मानद लेफ्टनंट कर्नलपद बहाल करण्यात आलं आहे. त्यामुळे धोनी आता लष्करात सेवा बजावू शकतो. मात्र, धोनी लष्करात जाऊन काय करणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनीला लष्करप्रमुखांनी सैन्यासोबत सराव करण्याची परवानगी दिली आहे. धोनी पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असल्यानं त्या रेजिमेंटमधूनच सराव करणार आहे. या रेजिमेंटचा सराव जम्मू आणि काश्मिरमध्ये होणार आहे. धोनीला सरावात भाग घेत असला तरी त्याला प्रत्यक्षात मोहिमांमध्ये सहभाग घेता येणार नाही, असं सांगण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त