मातृत्वाला सलाम ! लेकीसाठी आजी देणार बाळाला जन्म

नॉर्विच : वृत्तसंस्था – प्रत्येक स्त्रिचे स्त्रिपण आई होण्याने पूर्ण होते असे म्हटले जाते. आई होणे हे खूप पुण्याचं काम असतं असेही म्हटले जाते. मात्र, बऱ्याच मुलींना आई होण्याचे सुख मिळत नाही. असे असले तरी आधुनिक उपायांनी आई होता येऊ शकते. मात्र, इंग्लंडमधील नॉर्विच शहरात एक हृदयपर्शी घटना समोर आली आहे. नॉर्विच शहरात जन्मलेल्या जॅस्मिन बाउली या मुलीला वयाच्या सातव्या वर्षी पेल्विक एविंग्ज सारकोमा नावाचा कर्करोग झाला. या गंभीर आजारामुळे ती कधीच आई होणार नाही हे तिला माहीत होते.

जॅस्मिन 21 वर्षांची झाल्यावर ती एका तरुणाच्या प्रेमात पडली. त्यानंतर मात्र तिनं आई होण्याचा हट्ट धरला. परंतु ती आई होऊ शकत नाही असे डॉक्टरांचे म्हणणे होते. तिने हार न मानता विज्ञानाचा वापर करून हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचा प्रयत्न करून IVF द्वारे बाळाला जन्म देण्याचे ठरवले. मात्र, हा प्रयत्न अपयशी ठरल्याने ती निराश झाली होती. मात्र, आई ही आपल्या मुलांच्या सुखाचे नेहमीच पाहते. आपल्या मुलीसाठी जास्मीनच्या आईने एक धाडसी निर्णय घेतला.

जास्मिनची आई सब्रीना (वय-39) हिने आपल्या मुलीसाठी तिच्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. सरोगसी पद्धतीने सब्रीना जावई डॅनियलचे शुक्राणू वापरून गर्भधारणा करणार आहे. मात्र, या कुटुंबाचे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यांना 20 हजार डॉलर्सची गरज आहे. याबाबत तिने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मला असे वाटते की मी माझ्या मुलीसाठी आणि तिच्या जोडीदारासाठी करू शकणारी ही एकमेव आणि सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यांना जीवनातले सगळ्यात चांगले गिफ्ट मला देयचे आहे. मी अभिमानाने आई आणि गर्वाने आजी होईल.

जॅस्मिनला लहानपणी झालेल्या गंभीर आजाराचा परिणाम तिच्या गर्भाशयावर झाला. आई होणार नसल्याचे तिला समजल्यावर तिने अनेकवेळा आपले आयुष्य संपवण्याचा विचार केला. मात्र, आता तिची आईच तिच्या आयुष्यात आनंद घेऊन येणार असून तिचे आई होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. चार मुलींची आई असलेली सब्रीना आपल्या नातीला जन्म देण्यासाठी उत्सुक आहे. मात्र, यासाठी 20 हजार डॉलर्सची गरज असून त्यासाठी मदत करण्याचे आवाहन तिने सोशल मीडियावर केले आहे.

You might also like