‘या’ क्रिकेटपट्टूंना विजयाचा ‘उन्माद’, खेळपट्टीवरच बिअर पार्टी साजरी केली !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सामान्यतः खेळाडू रोमांचक आणि मोठ्या विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये सेलिब्रेशन करतात. हे साहजिक आहे. परंतु इंग्लंडच्या खेळाडूंना सेलिब्रेशन करण्यासाठी ड्रेसिंग रूम पेक्षा मैदान अधिक आवडते असं वाटतंय. म्हणूनच अ‍ॅशेस मालिकेच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात रोमांचक विजय मिळविल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी सर्व सीमा पार करत मैदानाच्या मध्यभागी जाऊन खेळपट्टीवर बिअर पिऊन विजय साजरा केला. इंग्लंडचे खेळाडू बिअर पीत होते, त्यावेळी मैदानात कोणतेही प्रेक्षक उपस्थित नव्हते. मात्र सोशल मीडियावर याची छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर हा विषय चर्चेत आला. हे फोटो सोशल मीडियावर इंग्लंडच्या एका समालोचकाने अपलोड केले होते. दरम्यान चाहत्यांनी यावर खेळाडूंनी विजयाचा जल्लोष करताना काळजी घ्यावी असे ट्वीट केले आहेत. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

इंग्लंडचा थरारक विजय :

रविवारी इंग्लंडच्या संघाने अ‍ॅशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना चुरशीची लढत देऊन जिंकला. इंग्लंडसमोर विजयासाठी ३५९ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. मात्र त्यांची गाडी २८६ धावांत गडगडली. ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित दिसत होता. पण त्यानंतर जॅक लीचसह बेन स्टोक्सने अखेरच्या विकेटसाठी नाबाद ७६ धावांची भागीदारी करुन आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह मालिका १-१ अशी झाली आहे. या वेळी बेननं १३५ धावांची अविअविश्वसनीय खेळी केली.

सामन्यानंतर स्टोक्सला अशी अविश्वसनीय खेळी खेळण्याआधी रात्री डोक्यात काय विचार होते. असे विचारले असता स्टोक्सनं मिस्किलपणे सांगितले, ‘ मी रात्री माझी पत्नी आणि मुलांसोबत असताना मला रात्री अचानक फ्राईड चिकन आणि चॉकलेट खाण्याची इच्छा झाली आणि सकाळी कॉफी प्यायलो”, असे सांगितले. या वेळी त्याने “हा सामना हातातून गेला तर, मालिका हातातून जाणार याची जाणीव होती आणि जेव्हा दहाव्या क्रमांकाचा फलंदाज मैदानात उतरला. तेव्हा आम्हाला ७० धावांची गरज होती. त्यावेळी सामना जिंकायचा आहे. याशिवाय काहीच विचार माझ्या डोक्यात नव्हता” असे सांगितले.

याआधी झाला होता ‘असा’ धक्कादायक प्रकार :

याआधी २०१३ मध्ये अ‍ॅशेस जिंकल्यानंतर उन्मादाच्या धुंदीत इंग्लंडच्या तीन खेळाडूंनी धक्कादायक प्रकार केला होता. ओव्हल मैदानाच्या खेळपट्टीवर स्टुअर्ट ब्रॉड, केविन पीटरसन आणि जेम्स अँडरसन या तीन खेळाडूंनी लघवी केली होती. दिग्गज खेळाडू या प्रकरणात अडकल्यानंतर मात्र इंग्लंडच्या संघाला आपल्या खेळाडूंच्या या चुकीबद्दल माफी मागावी लागली होती. यावेळी काही कारवाई होते का हे पाहणे गरजेचे आहे.

आरोग्यविषयक वृत्त –