‘या’ बॉलरमुळं आठवण झाली शेन वॉर्नच्या ‘बॉल ऑफ द सेन्चुरी’ची, क्रिकेट विश्व ‘अचंबित’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंडच्या जैक लीच ने टाकलेल्या एका चेंडूने सर्वांना शेण वॉर्नच्या ‘बॉल ऑफ द सेंचुरी’ची आठवण करून दिली. लीड्स टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाच्या वेळी इंग्‍लैंडच्या स्पिनर जैक लीच ने कांगारू ओपनर मार्कस हैरिसला ज्या चेंडूवर बोल्ड केले त्याची सर्वत्र चर्चा आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू इतका स्पीन झाला की थेट मार्कसला बोल्ड व्हावे लागले.

जैक लीच याने टाकलेल्या चेंडूची तुलना आता शेण वॉर्नच्या ‘बॉल ऑफ द सेंचुरी’शी होत आहे.  शेण वॉर्न ने टाकलेल्या चेंडू इतका स्पीन झाला होता की फलंदाज सुद्धा आश्चर्यचकित झाला होता. तसाच काहीस लीच याने टाकलेल्या चेंडूवर घडलं आहे हा चेंडू इतका स्पिन झाला की फलंदाजाला काही कळण्याच्या आत स्टॅम्पवर जाऊन आदळला.  हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘बॉल ऑफ द सेंचुरी’ नेमका काय प्रकार आहे
शेण वॉर्न ने आपल्या कारकिर्दीमध्ये अनेकदा समोरच्याला बुचकळ्यात पाडणारे चेंडू टाकले होते. १९९३ मध्ये एशेज सिरीजमध्ये त्याने असाच एक चेंडू टाकला होता ज्याला ‘बॉल ऑफ द सेंचुरी’ असे म्हणतात. याचे कारण की वॉर्न ने टाकलेला तो चेंडू ९० डिग्रीच्या कोनात स्पिन होऊन थेट स्टंपवर गेला होता.

 

आरोग्यविषयक वृत्त –