आजोबांनी लावलेल्या सट्ट्यामुळे फलंदाज झाला ‘मालामाल’, जिंकले 20 लाख रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा कसोटी सामना सध्या सुरु आहे. या कसोटी सामन्यात डोम सिब्लीने पहिले कसोटी शतक झळकावले. तसेच डोमने या शतकामुळे आपल्या कुटुंबासाठी वीस लाख रुपये देखील कमावले आहेत. याचे सर्व श्रेय डोमच्या आजोबाना जाते. 2011 मध्ये आपल्या मृत्यूच्या चार महिन्यांपूर्वी डोमच्या आजोबांनी नातवावर 150/1 आणि 66/1 च्या दराने सट्टा लावला होता की तो आपल्या देशासाठी क्रिकेट खेळेल. डोमने कसोटी क्रिकेटच्या पदार्पणातच शतक झळकावले. डोमने आजोबानी ज्या कारणासाठी सट्टा लावला ते खरे झाले त्यामुळे आता डोमला वीस लाख रुपये मिळाले आहेत. आजोबानी आपल्या नातवावर टाकलेला विश्वास डोमने प्रत्यक्षात उतरवून दाखवला आहे.

नोव्हेंबर 2019 मध्ये केले होते पदार्पण
गेल्या वर्षी न्यूझीलंड विरुद्ध 24 वर्षीय सलामीवीर डोमने कसोटी सामन्यात पदार्पण केले होते.
डोमची आई आणि मॅकेन्झी यांची मुलगी क्रिस्टीन सिब्ली दक्षिणपूर्व इंग्लंडच्या सरे येथील ‘विल्यम हिल बेटिंग’ येथे गेल्यानंतर त्यांना या सट्टेबाजीबाबत कळले. त्यांना या आधी त्यांना सट्ट्याबाबत कोणतीही कल्पना नव्हती.

डोम 5 वर्षांचा असताना त्याला वाटले की तो इंग्लंडकडून खेळू शकतो. जेव्हा तो 7 किंवा 8 वर्षांचा होता तेव्हा त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. यानंतर, त्याला विल्यम हिलमधील सट्टेबाबत माहिती मिळाली. डोमच्या आजोबांनी तो 15 वर्षांचा असताना सट्टा लावला होता. अशी माहिती डोमच्या आईने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे. डोमबाबात त्यानां खूप अभिमान आहे कारण त्याने क्रिकेटसाठी खूप कष्ट केल्याचे त्याच्या आईने यावेळी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/