अटीतटीच्या सामन्यात भारताचा ३१ धावांनी पराभव; विराटची झुंज व्यर्थ 

बर्मिंगहॅम : वृत्तसंस्था

भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा ३१ धावांनी पराभव झाला. अटीतटीच्या सामन्यात विराट कोहलीच्या उत्कृष्ट कामगिरी नंतर देखील भारताला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने या विजयासह ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताने काळाच्या ५ बाद १०० धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. कर्णधार विराट कोहली आणि दिनेश  कार्तिक ही जोडी विजय मिळवून देईल असे वाटत होते. मात्र मात्र दिनेश कार्तिकने कालच्या धावसंख्येत २ धावांची भर टाकून बाद झाला. त्याला अँडरसनने त्याला बाद केले. त्यानंतर हार्दिक पांड्या मैदानात आला. त्याने विराटसह सातव्या विकेटसाठी ३५ धावांची भागिदारी केली. ही जोडी भारताला विजय मिळवून देईल असे वाटत असतानाच कर्णधार विराट कोहली ५१ धावा करुन बाद  झाला. त्याला स्टोक्सने बाद केले. त्यापाठोपाठ मोहम्मद शमीला देखील स्टोक्सने शून्यावर बाद केले. तर इंग्लंडचा सॅम करन सामनावीर ठरला.

त्यानंतर आलेल्या ईशांत शर्माने काही काळ हार्दिकला साथ दिली. पण तो ११ धावांवर बाद झाला. त्याला आदिल रशीदने बाद केले. ईशांत बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ९ बाद १५४ अशी होती. अखेरचा खेळाडू उमेश यादव मैदानात आला. इंग्लंडला विजयासाठी केवळ एक गडी बाद करण्याची गरज होती तर भारताला ४० धावांची गरज होती. या दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा ४ षटके मुकाबला केला. पण अखेर स्टोक्सने हार्दिकला ३१ धावांवर बाद करत पहिल्या कसोटीतील विजयावर शिक्कामोर्तब केले. दुसऱ्या डावात इंग्लंडकडून स्टोक्सने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ५१ धावा केल्या.

धावफलक:
इंग्लंड: पहिला डाव- सर्वबाद २८७; दुसरा डाव- सर्वबाद १८०

भारत: पहिला डाव- सर्वबाद २७४; दुसरा डाव- सर्वबाद १६२

खालील लिंकच्या सहाय्याने पोलीसनामाचे फेसबूक पेज लाईक करा
https://www.facebook.com/policenama/