ICC World Cup 2019 : इंग्लंडच्या ‘या’ ६ खेळाडूंनी संघाला बनवलं विश्‍वविजेता !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलमध्ये काल सुपर ओव्हर देखील टाय झाल्यानंतर बाउंड्रीच्या आधारे इंग्लंडने विजय मिळवला. १९९२ नंतर पहिल्यांदा फायनलमध्ये खेळणाऱ्या इंग्लंडने वर्ल्डकप इतिहासात पहिल्यांदाच या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या स्पर्धेत विजय मिळवणारा इंग्लंड हा सहावा संघ झाला आहे. याआधी भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका,वेस्ट इंडिज यांनी या ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते. या स्पर्धेत इंग्लंडला विजेतेपद मिळवून देण्यासाठी संपूर्ण संघाने मोठ्या प्रमाणात कष्ट केले. इंग्लंडकडून खेळलेल्या इयान बॉथम, माइक गॅटींग, एंड्रयू स्ट्रास आणि एंड्यू फ्लिंटाफ यांना आपल्या कारकिर्दीत वर्ल्डकप स्पर्धेत विजय मिळवता आला नव्हता. कोणत्याही स्पर्धेत विजय मिळवण्यासाठी तुम्ही सांघिक प्रयत्न करणे खूप गरजेचे असते आणि इंग्लंडच्या संघातील सर्वच खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत आपल्या देशाला या स्पर्धेत विजय मिळवून दिला.

england-win

या सहा खेळाडूंचे महत्वाचे योगदान

जेसन रॉय और जॉनी बेयरस्टो
या दोन सलामीवीरांच्या कामगिरीने इंग्लंडला या स्पर्धेत जिवंत ठेवण्याबरोबरच विजय मिळवून देण्यात देखील महत्वाची भूमिका पार पाडली. या दोघांच्या सलामी कामगिरीने विरोधी संघाला सळो की पळो करून सोडले होते. दोघांनी या स्पर्धेत ४ शतकी भागिदाऱ्यांच्या बळावर ५०० पेक्षा अधिक धावा केल्या. संपूर्ण स्पर्धेत ४ शतकी भागीदारी करणारी ही एकमेव जोडी होती.

जो रूट –
इंग्लंडच्या संघाचा आधारस्तंभ असलेल्या या खेळाडूने या स्पर्धेत ५०० पेक्षा अधिक धावा केल्या. त्याने या स्पर्धेत २ शतके देखील झळकावली. वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानविरुद्ध त्याने शतकी खेळी केली.

इयोन मॉर्गन –
इंगडच्या या कर्णधाराने संपूर्ण स्पर्धेत उत्तम कर्णधारची जबाबदारी पार पाडण्याबरोबरच फलंदाज म्हणून देखील आपली छाप पाडली. वर्ल्डकप जिंकणारा मॉर्गन हा इंग्लंडचा पहिला कर्णधार ठरला आहे.

जोफरा आर्चर –
इंग्लंडच्या संघातील या वेगवान गोलंदाजाच्या कामगिरीचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे. या स्पर्धेत १५० पेक्षा अधिक वेगाने चेंडू टाकून फलंदाजांना हैराण करणाऱ्या इंग्लंडच्या या खेळाडूने संपूर्ण स्पर्धेप्रमाणेच सुपर ओव्हरमध्ये देखील इंग्लण्डला जिवंत ठेवले. या संपूर्ण स्पर्धेत त्याने २० विकेट घेतल्या.

बेन स्टोक्स –
इंग्लंडच्या या अष्टपैलू खेळाडूच्या कामगिरीमुळेच इंग्लंडला सामना टाय करता आला. त्याने अंतिम सामन्यात ८४ धावांची नाबाद खेळी करत आपल्या संघाला सामन्यात ठेवले. त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेत त्याने ११ सामन्यात ४६८ धावा देखील केल्या.

 सावधान ! साबण आणि टूथपेस्ट ने होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

 जिरे-आल्या चा रस प्या ! १० दिवसात पोट कमी करा

 कॅन्सर च्या उपचाराचा दावा करणाऱ्या मार्केटमुळे जगभरातील डॉक्टर चिंतेत !

 डायनिंग टेबलपेक्षा जमिनीवर बसून जेवण करणे योग्य ; जाणून घ्या फायदे

 खुशखबर ! १००० हून अधिक ‘औषध -गोळ्या’ होणार स्वस्त

‘परफेक्ट’ लिपस्टिक लावण्यासाठी काही खास टिप्स – जाणून घ्या

Loading...
You might also like