सनबर्न फेस्टिव्हलला पुणेकरांचा  विरोध का ?  

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन – संस्कृतीचा वारसा जपत समता, समानता व बंधूता प्रस्थापित करणारे,तसेच संतांच्या पदस्पर्शाने पावन अशी ओळख असलेल्या पुण्यनगरीत सनबर्न सारख्या धर्मद्रोही उत्सवाला परवानगी का दिली जाते. नेहमी हिंदू सणांसाठी लावले जाणारे नियम सनबर्नला का नाहीत? असा सवाल करत अमोल बालवडकर यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. दुपारी तीन वाजल्यापासून मध्यरात्री उशिरापर्यंत डॉल्बी साऊंड आणि डीजे कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात सुरु असतात.आर्थिक गणिते बघून सनबर्न फेस्टिव्हल रात्रभर चालवण्यास परवानगी दिली जाते.असा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.

सनबर्न फेस्टिव्हल विरोध ?…

उडत्या चालीची गाणी. त्यावर बेधुंद झालेली तरूणाई, कर्ण कर्कश्य आवाज अमली पदार्थांचा खुला बाजार अशी सनबर्न फेस्टिव्हलची ओळख आहे.सनबर्न फेस्टिवल म्हणजे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी असणारा गाण्यांचा कार्यक्रम पूर्वी गोव्यात होणार हा कार्यक्रम आता पुण्यातल्या बावधन जवळच्या लवळे गावाच्या डोंगर पायथ्याशी होतो.अनेक अवैध गोष्टी या कार्यक्रमात होत असल्याने तरूण पिढीवर याचा प्रचंड वाईट परिणाम होतो.त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण देखील वाढत आहे.असे अनेक पुणेकरांचे मत आहे.