मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाण अडकले लग्नाच्या बेडीत 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मराठी चित्रपटसृष्टीत चॉकलेट बॉय म्हणून ज्याची ओळख आहे.असा अभिनेता म्हणजेच अनिकेत विश्वासराव हा अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिच्यासोबत विवाहबंधनात अडकला आहे या दोघांचा विवाह सोहळा नुकताच पुण्यातील एका रिसॉर्टमध्ये पार पडला.या विवाह सोहळ्यासाठी कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि इंडस्ट्रीतील काही निवडक मित्रमैत्रिणीच आमंत्रित होते.

या जोडीचा ५ ऑगस्ट रोजी पुण्यातील हिंजवडी भागात साखरपुडा संपन्न झाला होता. या जोडीने साखरपुड्यात देखील कोणत्याही प्रकारचा गाजावाजा केला नव्हता. याबाबद स्नेहाला विचारले असता तीने सांगितले, आमचे अरेंज मॅरेज आहे. अफेयर वगैरे असं काहीच नव्हते. याआधी आम्ही एकमेकांना डेट देखील केले नव्हते.आम्ही लग्न करणार असल्याचं जून महिन्यात ठरल होत.आम्ही एक चित्रपट नुकताच एकत्र केला. त्याआधी आम्ही एकमेकांना फक्त ओळखत होतो.

फक्त एक  सहकलाकार आणि फ्रेंड्स एवढेच आमचे नटे होता. माझ्या घरचे माझ्यासाठी जानेवारी महिन्यापसून मुलगा शोधत होते.अनिकेतची मावशी आमच्याच सोसायटीत राहते. त्याची मावशी आणि माझी आई या दोघी चांगल्या मैत्रीणी असल्याने त्यांचे यासंदर्भात बोलणे झाले. मावशीने माझा अनिकेत नामक पुतण्या आहे. त्याच्यासाठी देखील मुलगी बघणे सुरु आहे. त्याच्याशी बोलून पाहू का? असे विचारले त्यानंतर सर्व बैठकी पार पडल्या आणि अशाप्रकारे आमच्या लग्नाबाबत असे अचानकच ठरले.

माझी आई व त्याची आई एकमेकांशी बोलले. त्यानंतर आम्ही दोघे फोनवर बोललो. आम्ही विचार केला की अनोळखी व्यक्तीबरोबर लग्न करण्यापेक्षा आपण एकमेकांना ओळखतो आणि एकाच क्षेत्रात काम देखील करत आहोत तर लाइफ पार्टनर म्हणून एकमेकांचा विचार नक्कीच करू शकतो.