English medium school fee | पालक अन् विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! राज्यातील इंग्रजी शाळेच्या शुल्कात 25 टक्के कपात

मुंबई न्यूज (Mumbai News) : पोलीसनामा ऑनलाइन –  गेल्या वर्षांपासून कोरोना संकटामुळे (Corona crisis) शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता आजही तशीच स्थिती आहे. मात्र शैक्षणिक संस्थांनी शुल्क आकारणी सुरूच ठेवली आहे. ऑनलाइनने शिक्षण (online Education) सुरु असून कोरोनामुळे आर्थिक स्थितीही कोलमडली आहे. त्यामुळे शुल्ककपात करण्याची मागणी पालकांनी केली होती. शाळा सुरूच नाही तर जादाचे शुल्क का भरायचे अशी भूमिका पालकांनी घेतली त्या पार्श्वभूमीवर मेस्टा संघटनेकडून (mesta) २५ टक्के शुल्ककपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या तब्ब्ल १८ हजार शाळेतील विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे (English medium school fee). एवढेच नाही तर कोरोनामुळे पालक गमवलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. English medium school fee | great relief to english school students in maharashtra 25 per cent fee reduction from mesta

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

शुल्क न भरल्यामुळे शाळा चालवणे अवघड झाले असून सर्वोच्च न्यायालयाने १५ टक्के फी करण्याचं सूचित केले होते. त्यामुळे मेस्टाने हा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार राज्यातल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी (English medium school students) अखेर २५ टक्के शुल्ककपात केली.
या निर्णयाचा लाभ राज्यातल्या १८ हजार शाळांतील विद्यार्थ्यांना होणार आहे.

Web Title : English medium school fee | great relief to english school students in maharashtra 25 per cent fee reduction from mesta

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Indian Navy SSC Recruitment-2021 । भारतीय नौदलात BE/BTech उमेदवारांसाठी नोकरीची संधी, पगार एक लाख; जाणून घ्या

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याकडून राष्ट्रवादीच्या महिला प्रवक्त्याला धमकी, जाणून घ्या प्रकरण

How to Increase Pregnancy Glow | प्रेग्नेंसी ग्लो 3 पटीनं वाढवेल ‘हे’ फेस मास्क, जाणून घ्या