फायद्याची गोष्ट ! BSNL चा खास प्लॅन, दररोज 5GB पर्यंत डाटा, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बीएसएनएल सध्या आपल्या ग्राहकांना जुन्या किंमतीमध्येच काही बेस्ट प्लॅनची ऑफर देत आहे. डिसेंबर 2019 मध्ये रिलायंस जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाने आपल्या प्रीपेड प्लॅनमध्ये 40 टक्के दरवाढ केली आहे तर सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने मात्र दरवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. ते ग्राहकांना जुन्या किंमतीमध्ये बेस्ट ऑफर देणार आहे ज्यामध्ये दररोज तब्बल 5 जीबीपर्यंत डेटा दिला जातो. चला तर जाणून घेऊया या प्लॅनबद्दल….

5जीबी डेटा दररोज
अधिक डेटाचा वापर करण्यासाठी बीएसएनएल हा प्लॅन बेस्ट आहे. या प्लॅनमध्ये रोज 5जीबी डेटा दिला जाणार आहे. 548 रुपयांच्या या PRBSTV (स्पेशल टॅरिफ व्हाउचर)मध्ये 90 दिवसांची वैधता असणार आहे. डेटा मर्यादा संपल्यानंतर ही इंटरनेट स्पीड कमी होऊन 80Kbps होतो. मात्र या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे मिळत नाहीत.

3जीबी डेटाचा प्लॅन
रोज 3जीबी डेटासाठी बीएसएनएलच्या 78 रुपयांच्या प्लॅनद्वारे रिचार्ज करता येणार आहे. 8 दिवस वैधता असलेल्या या डेटा STV मध्ये व्हाइस कॉलिंगसाठी रोज 250 मिनिटे मिळतात. याशिवाय व्हिडिओ कॉलिंगसाठी 250 मिनिटे मिळतात. या प्लॅनमध्ये EROS Now एंटरटेनमेंट सर्व्हिसचे फ्री सब्सक्रिप्शनही मिळते.

डेटा कॅपिंग नसलेला प्लॅन
कंपनीकडून युजर्ससाठी डेटा कॅपिंग नसलेला प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत 1,098 रुपये असून 84 दिवस याची वैधता आहे. या प्लॅनमध्ये एकूण 375जीबी डेटा मिळतो. या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे इंटरनेट डेटा मर्यादा नाही. बीएसएनएलच्या वेबसाइटवर हा प्लॅन अनलिमिटेड डेटा असलेला प्लॅन असल्याचं म्हटले जाते. या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 फ्रि एसएमएस मिळतात.