दुसऱ्या विद्यार्थ्यांबरोबर मैत्री केली म्हणून मित्रानेच गळा दाबून केली मैत्रिणीची हत्या

गुंटूर : पोलिसनामा ऑनलाईन – दुसऱ्या विद्यार्थ्यांबरोबर मैत्री केली म्हणून महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या तरुणीची तिच्याच मित्रानं गळा दाबून हत्या केली. ही घटना आंध्र प्रदेशातल्या गुंटूरमध्ये घडली आहे. अनुषा अस या तरुणीच नाव असून ती नरासराओपेट इथल्या कृष्णवेणी पदवी महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी विष्णूवर्धन रेड्डीवर गुन्हा दाखल केला आहे.

वर्गातल्या मुलाशी अनुषानं मैत्री केली होती. ती विष्णुवर्धनला पसंत नव्हतं. त्यानं याबद्दल अनुषाकडे नाराजी व्यक्त केली. या संदर्भात बोलण्यासाठी विष्णूवर्धन अनुषाला एका निर्जन स्थळी घेऊन गेला. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. तिथेच त्याने तिची गळा दाबून हत्या केली. तसेच तिचा मृतदेह पालापाडा येथील एका कालव्यात टाकला आणि स्वत:ला नरासराओपेट पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, अनुषाच्या कुटुंबीयांनी आणि मित्र परिवारानं मोठ्या संख्येनं एकत्र येत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी अनुषाच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच गुन्हेगाराला कठोर शिक्षा करण्यात येईल असे आश्वासन दिले .