…म्हणून ‘खिलाडी’अक्षयचा मुलगा ‘आरव’ला आवडत नाही क्रिकेट !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार क्रिकेटचा खूप मोठा फॅन आहे. ताे एवढं क्रिकेट पाहतो आणि त्याला यात इतका इंट्रेस्ट आहे की, त्याची ६ वर्षांची मुलगीही या गेमची फॅन झाली आहे. परंतु अक्षय कुमारचा मुलगा आरवला क्रिकेट आवडत नाही. लंडनमध्ये Star Sports Philips Hue Cricket Live चा हिस्सा बनलेल्या अक्षय कुमारने सांगितले की, का आरवला क्रिकेट आवडत नाही?

image.png

अक्षयने म्हणाला की, “माझ्या मुलाला क्रिकेट आवडत नाही. परंतु मुलगी निताराला हा गेम खूप आवडतो. ती फक्त ६ वर्षांची आहे. परंतु क्रिकेट पहायला तिला खूप आवडतं. आरवला क्रिकेट आवडत नाही कारण मी खूप क्रिकेट पाहतो. मी क्रिकेट पाहतो त्यामुळेच माझ्या मुलीला हा गेम आवडतो. जेव्हा मी क्रिकेट पाहतो तेव्हाच तिला हा गेम पाहायला मिळतो.

यावेळीच अक्षयला ते दिवस आठवले जेव्हा तो स्वत: क्रिकेट खेळत असे. अक्षय म्हणाला की, “मी शाळेत असताना क्रिकेट खेळायचो.” जास्त करून खिलाडी अक्षय आपल्या बॅटींग आणि बॉलिंग टॅलेंटमुळे निवडला जायचा. परंतु तो म्हणतो की, “माझं सिलेक्शन माझ्या चांगल्या फिल्डींगमुळे होत असे. लोकं म्हणायचे की, हा मुलगा फिल्डींगसाठी आहे. हा पळेल आणि चौकार अडवेल.”

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्या अक्षय कुमार सुर्यवंशी या आगामी सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. रोहित शेट्टीच्या या सिनेमात अक्षय कॅटरीना कैफसोबत दिसणार आहे. हा सिनेमा २०२० मध्ये रिलीज होणार आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

 

You might also like