जया यांच्या पुर्वी ‘बिग बी’ अमिताभ यांचं मन आलं होतं दिल्‍लीतील ‘या’ मुलीवर, DTCच्या बसमध्ये पहात होते वाट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या सोनी चॅनलवर सुरु असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती 11’ सुरु आहे. या शो दरम्यान बीग बींचे त्यांच्या आयुष्यातील खास किस्से समोर येत आहेत. या शो दरम्यान बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन स्पर्धकांच्या आयुष्यातील गुपितं सर्वांसमोर उघड करत आहेत. यावेळी त्यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यात घडलेले काही रंजक किस्से सर्वांसमोर उघड केले आहेत.

बुधवारी झालेल्या शोमध्ये अमिताभ यांनी दिल्ली येथे शिक्षण घेत असतानाचा एक किस्सा सांगितला. कॉलेजचे शिक्षण घेत असताना अमिताभ दिल्लीमधील तीन मूर्ती येथे रहात होते. कॉलेजला जाण्यासाठी त्यांना बसने प्रवास करावा लागत होता. ही बस कनॉटप्लेस (सीपी) मार्गाहून युनिवर्सिटीत जात होती. या मार्गावर खासकरून आयपी, मिरांडा हाऊसला जाणऱ्या सुंदर मुली बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी आम्ही या बसमध्ये सुंदर मुली चढण्याची वाट पहात असे, असे बीग बी यांनी यावेळी सांगितले.

पुढे सांगताना अमिताभ यांनी सांगितले की, काही वर्षानंतर माझे पदवीधर शिक्षण पूर्ण झाले आणि मी नोकरी करू लागलो. दरम्यान माझी ओळख त्या बसमध्ये चढणाऱ्या सुंदर मुलीशी झाली. त्या मुलीने मला एक मजेदार गोष्ट सांगितली. जेव्हा तुम्ही युनिवर्सिटीमधून शिक्षण घेत होता त्यावेळी तुमची एक झलक पाहण्यासाठी आम्ही वाट पाहात बसायचो. ती दररोज तिचा मित्र प्राणसह मला पाहण्यासाठी त्या बसस्टॉपवर येत होती असे अमिताभ यांनी पुढे सांगितले.