IPS अधिकाऱ्याने केलेल्या श्रीदेवीच्या मर्डरच्या दाव्यानंतर बोनी कपूर यांनी केलं ‘हे’ वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूबद्दल नुकतेच डीजीपी ऋषिराज सिंह यांनी धक्कादायक दावा केला. ज्यामध्ये त्यांनी म्हणले आहे की, अभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाला नव्हता तर तिचा मर्डर झाला होता. हा दावा केल्यानंतर एक नवीन वादाने जन्म घेतला आहे. या दाव्यानंतर श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांचे वक्तव्य समोर आले आहे.

डीजीपी यांनी जो दावा केला आहे त्यावर श्रीदेवीचे पति बोनी कपूर यांचे वक्तव्य समोर आहे. डीजीपी यांच्या दाव्यावर बोनी कपूरचे म्हणणे आहे की, मी असल्या बकवास गोष्टींवर काहीच उत्तर देऊ शकत नाही. त्याचबरोबर अशा गोष्टींवर मी कोणतेच रिअॅक्शन देऊ शकत नाही. कारण अशा चुकीच्या बातम्या येतच असतात. तुम्ही त्याला थांबवू शकत नाही. हा कोणाच्या तरी कल्पनेचा हिस्सा आहे. श्रीदेवीच्या मृत्यूनंतर बोनी कपूर खूपच निराश झाले आहे. ते नेहमी आपल्या पत्नीची आठवण काढून बोलत असतात. नुकत्याच एका चॅट शोमध्ये श्रीदेवीची आठवण काढून ते खूपच भावूक झाले होते.

एका बाजुला अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूची चर्चा होत आहे की, लोकांना प्रश्न पडला आहे की, हे कसे काय घडू शकते आणि दुसऱ्या बाजुला डीजीपी यांनी हा दावा आपला मित्र फॉरेंसिक सर्जन डॉ. उमादथनद्वारे केला आहे. ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे.  डॉ. उमादथन यांचे निधन केरळच्या हॉस्पिटलमध्ये झाले.

ऋषिराज सिंह यांनी आपला मित्र डॉ. उमादथन यांच्या मृत्यूवर एक लेख लिहला होता. यामध्ये त्यांनी आपल्या मित्राबद्दल उल्लेख केला होता. त्यामध्येच त्यांनी श्रीदेवीच्या मृत्यूचा पण उल्लेख केला आहे. ऋषिराज यांनी लिहले की, ‘माझ्या मित्राने सांगितले होते की, कोणताही व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये एका बाथटबमध्ये बुडून मरु शकत नाही.’

ऋषिराज यांनी लेखमध्ये लिहले की, ‘हे शक्य नाही की, कोणी एक फुट बाथटबमध्ये बूडुन मरत नाही. माझ्या मित्राने सांगितले होते की, एखाद्या व्यक्तीला एक फुट बाथटबमध्ये कोणीतरी जबरदस्तीने बुडवून मारु शकतो. मित्राचा दावा होता की, तिचे पाय कोणीतरी पकडले असतील यांनतर श्रीदेवीचे डोके पाण्यात बुडवले गेले.’

श्रीदेवीच्या मृत्यूनंतर दुबई पोलिसांनी दीर्घ चौकशी केली. परंतु पुराव्याच्या अभावामुळे त्याच्या मृत्यूचे वास्तविक कारण कळाले नाही. तिचा मृत्यू एक अपघात सांगितला होता. यानंतर, साडेतीन वर्षांनंतर डी.सी.पी. ऋषिराज सिंगच्या मित्राने लिहिलेल्या लेखांमुळे पुन्हा वादविवादाने वाढला आहे. डीजीपी आपल्या मित्राद्वारे असे दावे करत आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त –

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’