Video : ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीच्या ‘बेली डान्स’चा ‘बाटला हाऊस’मध्ये ‘तडका’ ; ‘साकी-साकी’ गाण्याचा टीजर रिलीज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दिलबर गर्ल नोरा फतेही पुन्हा एकदा आपल्या बेली डान्सने चाहत्यांना घायाळ करायला येणार आहे. नोराने २०१८ मधील जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयतेमधील दिलबर या गाण्यावर डान्स केला होता. यानंतर पुन्हा एकदा जॉनच्याच बाटला हाऊस या सिनेमात साकी-साकी या गाण्यावर तिने बेली डान्स केला आहे. या गाण्याचा टीजर लाँच करण्यात आला आहे.

संजय दत्त, अनिल कपूर आणि समीरा रेड्डी यांच्या मुसाफिर मधील गाण्याचाच हा रिमेक आहे. कोयना मित्राने या गाण्यावर डान्स केला होता. सध्या नोराने डान्स केलेल्या गाण्याचा केवळ टीजर समोर आला आहे. १५ जुलै रोजी हे गाणं रिलीज करण्यात येणार आहे. बाटला हाऊसमध्ये आता नोरा फतेही आयटम साँग करणार आहे.

नुकताच बाटला हाऊस सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात जॉन अब्राहम लिड रोलमध्ये दिसणार आहे. या सिनेमात जॉनच्या भूमिकेचे नाव संजीव कुमार यादव असणार आहे, ज्यांचा बाटला हाऊस एनकाऊंटरमध्ये महत्त्वाचा रोल होता. हा सिनेमा एक थ्रिलर ड्रामा असणार आहे. रितेश शाह यांनी हा सिनेमा लिहिला आहे. निखिल आडवाणी हा सिनेमा डायरेक्ट करत आहेत.

या सिनेमात जॉन अब्राहम ज्या पोलिस अधिकाऱ्याचा रोल करत आहे त्यांच्या नावे ७० एनकाऊंटर, ३० प्रकरणात २२ लोकांना शिक्षा देणं आणि ९ वीरता पुरस्कार मिळवण्याचं रेकॉर्ड आहे. या सिनेमावर ऑक्टोबर मध्ये काम सुरु झालं होतं. या सिनेमाची शुटींग दिल्ली, जयपूर, लखनऊ, मुंबई आणि नेपाळ मध्ये झाली आहे. निखिल आणि रितेश यांनी एअरलिफ्ट आणि डी डे सिनेमांच्यावेळी सोबत काम केले आहे. ४ वर्ष रिसर्च केल्यानंतर रितेशने हा सिनेमा लिहिला आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त –

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

 

 

You might also like