‘हे’ ५ अभिनेते बॉलिवूडमधील ‘बड्या’ आणि ‘पॉप्युलर’ घराण्याचे ‘जावई’बापू !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ८० च्या दशकात कुमार गौरव यांची सिनेमात एन्ट्री झाली. कोणी विचारही केला नव्हता की, चॉकलेट बॉय सारखा दिसणारा हा चेहरा रातोरात स्टार बनेल आणि बाकी कलाकारांसाठी काटे की टक्कर होईल. कुमार गौरव यांनी आजच आपला वाढदिवस साजरा केला आहे. कुमार गौरव यांचे पिता ६० आणि ७० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता आहेत. संजय दत्त म्हणजे संजू बाबा कुमार गौरव यांचा मेहुणा आहे. कुमार यांनी सुनिल दत्त यांची मुलगी आणि संजयची बहिण नम्रता दत्तशी लग्न केलं आहे. बॉलिवूडमध्येही असे अनेक स्टार्स आहेत जे बड्या घराण्याचे जावई आहेत.

१) कुणाल खेमू 
बॉलिवूडमध्ये बाल कलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या अॅक्टर कुणाल खेमूने आपल्यापेक्षा ५ वर्षाने मोठ्या असणाऱ्या प्रियसी सोहा अली खानसोबत लग्न केलं आहे. सोहा पटौदी खानदानाची मुलगी आहे. २०१४ साली दोघांनी लग्न केलं. त्यांना एक इनाया नावाची मुलगीही आहे.

image.png

२) धनुष
धनुष साऊथ सिनेमातील सुपरस्टार तर आहेच सोबतच तो सुपरस्टार रजनीकांत यांचा जावईदेखील आहे. धनुषने २००४ साली ऐश्वर्या रजनीकांत सोबत लग्नगाठ बांधली.

image.png

३) फरदीन खान
फरदीन खानने ७० च्या दशकातील सुपरहिट अॅक्ट्रेस मुमताजची मुलगी नताशा सोबत २००५ साली लग्न केलं होतं. सिनेमात फ्लॉप ठरलेल्या फरदीन खानने १९९८ मध्ये प्रेम अग्नि सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती.
Fardeen and Natasha khan

४) शरमन जोशी
अभिनेता शरमन जोशी बॉलिवूडमध्ये आपल्या कॉमेडी स्टाईलसाठी फेमस आहे. त्याला गोलमाल आणि ब्लॉकबस्टर सिनेमा ३ इडियट्सने खूपच ओळख मिळाली आहे. क्वचितच तुम्हाला माहिती असेल की, शरमन जुन्या सिनेमातील प्रसिद्ध विलेन प्रेम चोपडा यांचा जावई आहे. २००० साली शरमनने प्रेम चोपडाची मुलगी प्रेरणा सोबत लग्न केलं.

image.png

५) कुणाल कपूर
अॅक्टर कुणाल कपूरला तुम्ही रंग दे बसंती सिनेमात पाहिलं आहे. त्याची पत्नी बॉलिवूडमधील किती मोठ्या घराण्यातून आहे हे तुम्हाला माहीत नसेल. कुणाल महानायक अमिताभ बच्चन यांचे लहान बंधू अजिताभ बच्चन यांचा जावई आहे.

image.png

आरोग्यविषयक वृत्त

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

वयाच्या पस्तिशीनंतर हाडे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

 

Loading...
You might also like