‘मसाबा’च्या घटस्फोटावर आई नीना गुप्ता म्हणाली, ‘लग्न करण्यापेक्षा लिवइनमध्ये रहा’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार नीना गुप्ताची लेक आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिनं पतीपासून घटस्फोट घेतला. तिचा पती मधु मंटेना प्रसिद्ध फिल्म निर्माता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यामध्ये खटके उडत होते. आता दोघे वेगळे झाले आहेत. मसाबा आणि मधु यांच्या घटस्फोटावर मसाबाची आई नीना गुप्तानं भाष्य केलं आहे. आपल्या वक्तव्यामुळं नीना गुप्ता चर्चेत आली आहे. लग्नापेक्षा लिवइनमध्ये राहिलेलं चांगलं असं नीना म्हणाली आहे.

एका मुलाखतीत बोलताना तिनं मुलीच्या नात्यावर बोलताना सांगितलं की, तिनं कधीच मसाबाला लिवइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला नव्हता. परंतु आता तिला लिवइनपासून काहीही अडचण नाहीये. मुलीच्या डिवोर्स आणि इतरही अशी प्रकरणं पाहिल्यानंतर तिच्या विचारसरणीत बदल झाला आहे.

View this post on Instagram

#sachkahoontoe

A post shared by Neena ‘Zyada’ Gupta (@neena_gupta) on

मुलाखतीत पुढे बोलताना नीना म्हणाली, “लग्नाचा एवढा खर्च करा, एवढी मेहनत घ्या, एवढी शोबाजी करा आणि नंतर तुम्ही घटस्फोट घेता. अरे यार यापेक्षा लिवइन करा ना. मला वाटतं गेल्या 3-4 वर्षात माझ्या विचारसरणीत खूप बदल झाला आहे.”

नीनानं अलीकडेच एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात तिनं विवाहित पुरुषावर प्रेम न करण्याचा सल्ला दिला होता. तिचा हा व्हिडीओ सोशलवर प्रचंड व्हायरल झाला होता. आपल्या या व्हिडीओमुळं नीना चर्चेत आली होती.

नीना गुप्ताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती शुभ मंगल ज्यादा सावधान या सिनेमात दिसली होती. लवकरच ती 83 या सिनेमात रणवीर सिंग सोबत काम करताना दिसणार आहे. या सिनेमात तिनं रणवीरच्या आईची भूमिका साकारली आहे.