निक जोन्सच्या वाढदिवसानिमित्त प्रियंका चोपडानं शेअर केला ‘हा’ खास व्हिडिओ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशी गर्ल प्रियांका चोपडा आणि हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक निक जोन्स यांनी नात्याची कायमच चर्चा असते. ते कायमच आपले फोटो व्हिडिओच सोशल मिडियावर शेअर करत असतात. आता निकचा वाढदिवस असल्याने प्रियंकाने त्याच्यासाठी खास व्हिडिओ शेअर करत शुभेच्छा दिल्या. प्रियंकाच्या वाढदिवसाला देखील निकने मियामी येथे खास केकसह तिला सरप्राईज दिले होते.

या व्हिडिओत निक आपल्या चाहत्यांच्या गर्दीतून बाहेर येताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत प्रियंकाने लिहिले की तू माझ्या आयुष्याचा प्रकाश आहे, तुझ्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण अत्यंत खास आहेत. तू जगातील प्रत्येक आनंदीक्षणांसाठी पात्र आहेस. तू माझ्या आयुष्यात आला त्याबद्दल तुझे आभार, वाढदिवसांच्या खूप खूप शुभेच्छा. आय लव्ह यू. निकने या व्हिडिओवर कमेंट देताना लव्हचे इमोजी पोस्ट केले आहे. प्रियंकाचा आणि निकचा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीला उतरत आहे.

View this post on Instagram

It’s in the air.. ❤️

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

प्रियंका आणि निक यांच्या डिसेंबर 2018 साली राजस्थानच्या जोधपूरमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन धर्म पद्धतीने विवाह झाला होता. या विवाहास दोघांचे कुटूंबीय, मित्र मंडळी हजर होते. हा विवाह थाटामाटात पार पडला होता.

View this post on Instagram

❤️

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

You might also like