#Video : सपना चौधरीचे नवे गाणे रिलीज, पहा सपनाचा ग्लॅमरस लुक आणि पंजाबी ठुमके

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – डान्स शोपासून ते हिट साँग पर्यंत हरियाणवी डान्स सपना चौधरीने यश प्रसिद्धी मिळवण्यासाठी एक खडतर प्रवास केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती चर्चेत आहे. तिच्या डान्स शोचे व्हिडीओचे व्हिडीओ नेहमीच समोर येत असतात. नुकतेच सपना चौधरीचे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. ईदच्या निमित्ताने हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. काही तासांतच या व्हिडीओला एक लाखाहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. या गाण्यात सपना सोबत सिंगर वसीम शेखही दिसत आहे. सपना फक्त डान्सच नाही केला तर वसीमसोबत गाणेही म्हटले आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, सपनाचे याआधीही दलेर मेहंदीसोबत बावली तरेड़ हे गाणं रिलीज झालं आहे.

नचके दिखा हे सपनाचं नवीन गाणं आता समोर आलं आहे. सध्या हे सोशलवर पसरताना दिसत आहे. असे वाटत आहे की, या गाण्याला डान्स नंबर्सच्या यादीत यायला वेळ लागणार नाही. हे एक पंजाबी गाणे आहे त्यात सपना असल्याने हे गाणं ऐकल्यावर तुम्हीही थिरकताल. याआधीही तिचे बावली तरेड़ गाणे सोशलवर गाजले होते.

तुम्हाला सांगू इच्छितो की, बिग बॉस या शोमुळे सपना आणखी प्रकाशझोतात आली. आता सपना चौधरी आपल्या डान्समुळे केवळ स्टेजवरच नाही तर चाहत्यांच्याही मनावर राज्य करताना दिसत आहे.

You might also like